सिंधुदुर्ग : राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचा सन्मान | पुढारी

सिंधुदुर्ग : राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांचा सन्मान

कणकवली; पुढारी वृत्तसेवा : ५१ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आज (दि.१२) सावंतवाडी येथे पार पडले. या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी विज्ञाननिष्ठ प्रयोगशाळा कर्मचार्‍यांचा राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघातर्फे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूरच्या संचालिका डॉ. राधा आतकरी व राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाचे राज्यध्यक्ष भरत जगताप, राज्य संघटक टी.एम.नाळे, सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र कांबळे, सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र काळे, जिल्हा सचिव राजेंद्र तवटे, जिल्हा खजिनदार वीरेंद्र गोसावी, उपाध्यक्ष सूर्यकांत चव्हाण व प्रयोगशाळा कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. राधा आतकरी यांनी सहभागी विज्ञाननिष्ठ प्रयोगशाळा कर्मचार्‍यांनी सादर केलेल्या प्रायोगिक शैक्षणिक साधनांचे कौतुक केले. तसेच राज्य महासंघाचे अभिनंदन केले. विद्यार्थी हितासाठी व विज्ञान शिक्षकांच्या सहकार्यासाठी शाळा तिथे प्रयोगशाळा कर्मचारी आवश्यक आहे. तरच विज्ञाननिष्ठ विद्यार्थी घडणार आहेत. राज्य महासंघाकडून गेली १६ वर्षे प्रयोगशाळा कर्मचारी यांना सन्मानित करण्यात येत आहे, असे राज्याध्यक्ष भरत जगताप यांनी सांगितले. कार्यक्रमानंतर आभार सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष रामचंद्र काळे यांनी मानले.

हेही वाचा :

Back to top button