रत्नागिरी: गणेश विसर्जन मिरवणुकीची अमेरिकन तरुणांना भुरळ

रत्नागिरी: गणेश विसर्जन मिरवणुकीची अमेरिकन तरुणांना भुरळ

रत्नागिरी: पुढारी वृत्तसेवा: कोकणातील गणेशोत्सवाची भुरळ परदेशी पाहुण्यांना पडली आहे. अमेरिकेतील दोन तरुण गणपती विसर्जन पाहायला रत्नागिरीत दाखल झाले आहेत. घरगुती गणेशोत्सव विसर्जनाचा आनंद त्यांनी घेतला.

टायलर आणि जो हे दोन अमेरिकन तरुण रत्नागिरीतील विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले. ते गणरायांना उचलून घेत विसर्जनस्थळी घेऊन गेले. यावेळी त्यांचा आनंद चेहऱ्यावर दिसून येत होता.

या अनोख्या उत्सवाची भुरळ पडल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. तत्पूर्वी टायलर आणि जो यांनी रत्नागिरीचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन गणरायाचे आशीर्वाद घेतले. यावेळी मंडळाच्या वतीने दोघांनाही गणरायाची प्रतिमा भेट देण्यात आली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news