Ratnagiri FDA Inspection | सावधान... नवरात्रोत्सवात निकृष्ट दर्जाची वरी ठरू शकते घातक

Ratnagiri FDA Inspection | अन्न व औषध प्रशासनाची असणार करडी नजर; तपासणीसाठी पथकाची नियुक्ती
Ratnagiri FDA Inspection
Ratnagiri FDA Inspection
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
नवरात्रोत्सवाला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. या उत्सवात वरी, साबू, रवा सह उपवासाच्या पदार्थाला मोठी मागणी असते. या काळात बाजारात वरीची (भगर) मोठ्या प्रमाणात विक्री होते. मात्र काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची वरी विक्रीसाठी येण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी.

Ratnagiri FDA Inspection
CCTV Camera| रत्नागिरी जिल्‍ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सीसीटीव्‍ही बसवणार

अन्न व औषध विभागाची करडी नजर असणार असून वरीच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. नैवेद्यासाठी बाजारात विविध प्रकारची फळे, मिठाईची विक्री होत असते. याच काळात भक्त ९ दिवस उपवास करत असतात.

उपवास सोडण्यासाठी खिचडी, वरी तांदळाचा भात, साबू, फळे खाऊन उपवासा सोडत असतात. यामध्ये जास्ती जास्त वरी, साबूचा समावेश असतो. या पार्श्वभूमीवर बाजारातील उपवासाच्या पदार्थाच्या विक्रीवर प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. वरी खरेदी करताना तिचा दर्जा, पॅकिंग, उत्पादनाचा तारीख व कालबाह्य होणारी तारीख तपासणी आवश्यक आहे.

सीलबंद पाकिटातील व विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच वरी खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले. गणेशोत्सवात शिळी मिठाई व निकृष्ट मिठाई विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून मुद्देमाल, दंड आकारण्यात आला. नवरात्रीसह आगामी येणाऱ्या दसरा, दिवाळीनिमित्त बाजारात मिठाई खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असते.

मिठाई, खवा, नमकीन पदार्थ, कच्चे अन्नपदार्थाचे नमुने घेऊन अन्न प्रशासनाकडून तपासणी केली जात आहे. बेस्ट बिफोरची नियमाबाबत शिथिलता असली तरी ग्राहकांना चांगल्या दर्जाची मिठाई द्यावी, निकृष्ट दर्जाची मिठाई विक्री केल्यास कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.

Ratnagiri FDA Inspection
Ratnagiri News| देवरुख-रत्नागिरी मार्ग बनलाय अत्‍यंत धोकादायक

नागरिकांनो... अशी घ्या काळजी

  • पॅक बंद असलेली चांगल्या दर्जाची वरी तांदूळ खरेदी करावा.

  • ओलसर बुरशीजन्य वरी सेवन होणार नाही, याची दक्षता घ्या.

  • रस्त्यावरील, हातगाडीवरील वरी तांदळाचे पीठ खरेदी करू नये.

  • सकाळी केलेले वरी तांदळाचा भात संध्याकाळी, रात्री खाऊ नये.

  • वरी खरेदी केल्यानंतर ती स्वच्छ धुऊन घरगुती पद्धतीने पीठ तयार करावे.

  • वरी तांदळाच्या पॅकेटवरील तारीख व मुदत पाहून खरेदी करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news