CCTV Camera| रत्नागिरी जिल्‍ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सीसीटीव्‍ही बसवणार

जि. प. आरोग्य समिती बैठकीत ठराव; सर्पदंशावरील लसी मुबलक ठेवण्‍याच्‍या आरोग्य सभापती विलास चाळके यांच्‍या सूचना
CCTV Camera
रत्नागिरी जिल्‍ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सीसीटीव्‍ही बसवणार
Published on: 
Updated on: 

रत्‍नागिरी : रत्‍नागिरी जिल्‍ह्यातील प्रत्‍येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षेसाठी सीसीटीव्‍ही बसवण्याचा निर्णय आरोग्य समितीच्‍या बैठकीत घेण्यात आला आहे. जिल्‍ह्यातील ६० प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी काही केंद्रात प्रायोगिक तत्‍वावर सीसीटीव्‍ही बसवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्‍यानंतर उर्वरित आरोग्य केंद्रात टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सीसीटीव्‍ही बसवण्याचा निर्णय झाला असल्‍याची माहिती उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती विलास चाळके यांनी दिली.

जिल्‍हा परिषद सभागृहात जिल्‍हा परिषद आरोग्य समितीची बैठक झाली. या बैठकीसाठी जिल्‍हा परिषद सदस्य महेंद्र मांडवकर, विक्रांत जाधव, संतोष थेराडे, जिल्‍हा आरोग्य अधिकारी अनिरूध्द आठल्‍ये, अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्य अधिकारी महेंद्र गावडे आदी उपस्‍थित होते.

जिल्‍ह्यात भात कापणीला लवकरच होईल. भात कापणीवेळीस सर्पदंशाची घटना घडण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे संर्पदंशावरील लसीचा पुरवठा मुबलक प्रमाणात ठेवा, रूग्णांची गैरसोय होवू देवू नका अशा सूचना देण्यात आल्‍या आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडीचे प्रमाण जास्‍तीत जास्‍त वाढवा, आरोग्य विभागातील विविध योजना राबवल्‍या आहेत. त्‍याच्‍या खर्चाचा अहवाल सादर करा, असे आदेश देण्यात आले आहेत. सफाई कामगारांचे वेतन वेळेत व ऑनलाईन पध्दतीने करा, अशा सूचना चाळके यांनी आरोग्य विभागाला दिल्‍या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news