Ratnagiri News| देवरुख-रत्नागिरी मार्ग बनलाय अत्‍यंत धोकादायक

रस्त्याच्या दुतर्फा झाडीझुडपे बनलीत मृत्यूचा सापळा
Ratnagiri News
देवरुख-रत्नागिरी मार्ग बनलाय अत्‍यंत धोकादायक
Published on: 
Updated on: 

साडवली : देवरुख-रत्नागिरी मार्गावर पाटगाव ते बावनदी पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले उंच गवत व झुडपे प्रवासी व वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. गत महिन्यात याच मार्गावर रेड्याच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला आहे.

वाढलेल्या झाडीमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही, त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या दुतर्फा निर्माण झालेल्या जंगलसदृश स्थितीमुळे जंगली प्राण्यांचा वावरही वाढला आहे. या मार्गाला पाटगाव, पूर, कर्ली, माळवाशी, आंबव, निवेबुद्रूक, वायंगणे, किरडुवे, तुळसणी, तळेकांटे, पांगरी, बावनदी आदी गावे जोडलेली आहेत. दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असते.

याबाबत कोसुंब जि.प. गटाचे (उ.बा.ठा.) विभाग प्रमुख संतोष जाधव (माळवाशी) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित यंत्रणेने वेळीच लक्ष द्यावे, अन्यथा प्रवाशांना सोबत घेऊन आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा जाधव यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news