सिंधुदुर्ग : विजयदुर्ग हे हेलियमचे पाळणाघर – माजी आमदार प्रमोद जठार

सिंधुदुर्ग : विजयदुर्ग हे हेलियमचे पाळणाघर – माजी आमदार प्रमोद जठार
Published on
Updated on

हेलियम वायुच्या शोधाचे हे १५५ वे वर्ष आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम वायुचा शोध लागला म्हणून विजयदुर्ग हे हेलियमचे पाळणाघर आहे असे मत माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासन प्रायोजक सिंधुरत्न समृध्दी योजना समिती व विजयदुर्ग ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विजयदुर्ग येथे विश्व हेलियम डे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच रियाज काझी,आरिफ बगदादी,रविंद्र तिर्लोटकर, पवन परुळेकर, प्रसाद देवधर,शुभा कदम,रघुनाथ धुळप, राजेंद्र परुळेकर, सुनिल आठवले,लता गिरकर,मनाली कामतेकर आदी उपस्थित होते.

 जठार म्हणाले विज्ञानातील एका शोधाचा दिवस आज येथे उत्साहात साजरा होत आहे.विजयदुर्ग येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत लवकरच खगोलकेंद्र.संग्रालय.लेझर शो व्हावे यासाठी ५ कोटी निधीचा प्रस्ताव सिंधुरत्न समृध्दी योजना समितीकडे दिला असून पुढील दोन वर्षात येथे नक्की केंद्र उभे राहील असा विश्वास दिला.यावेळी डॉ सुनिल आठवले यांनी हेलियम वायुच्या शोधाविषयी लघुचित्रपटाव्दारे शालेय विद्यार्थ्यांना माहीती दिली.विजयदुर्ग डेपो ते विजयदुर्ग किल्ला साहेबाचे ओटे पर्यंत भव्य मिरवणूक यावेळी काढण्यात आली. सर्व शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news