'आंबेड बुद्रूक' येथे मोटरसायकलचा भीषण अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी - पुढारी

'आंबेड बुद्रूक' येथे मोटरसायकलचा भीषण अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी

साडवली : पुढारी वृत्तसेवा

मुंबई- गोवा महामार्गावरील आंबेड बुद्रूक येथे दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात बुलेट मोटरसायकलवरील एकजण जागीच ठार झाला आहे. तर ॲक्सिस मोटरसायकलवरील दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी सायंकाळी ७.३० वाजता घडला.

याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात विश्रुत सत्यन नायर (वय-२९) हा जागीच ठार झाला आहे. तर ॲक्सिस मोटरसायकलवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे.

या अपघातातील मृत झालेला विश्रुत नायर हा मुळचा केरळमधील असून, तो संगमेश्वरमधील बँक आँफ इंडीया बँकेतील कर्मचारी आहे. तो बुलेटवरून रत्नागिरीहून संगमेश्वरला येत होता. तर अँक्सीस मोटारसायकलवरून दोघेजण आंबेडमधून रत्नागिरीकडे चालले होते. या मोटारसायकलची आंबेड बुद्रूक येथे समोरासमोर भीषण अपघात घडला.

या अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उदय झावरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस हवालदार संतोष झापडेकर व पोलीस शिपाई सोमनाथ आव्हाड यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. व विश्रुत नायर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आला. याबाबतचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.

हे ही वाचा :

 

Back to top button