कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निषेध करत आहोत. मंत्री राणेंच्या दोन्ही मुलांना भाजपकडून उमेदवारी मिळावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना खूश करण्यासाठीच राणे यांनी शंकराचार्यांवर टीका करण्याचे धाडस केले, अशी टीका ठाकरे गटाचे कणकवली विधानसभा अध्यक्ष सतिश सावंत यांनी आज (दि.१५) येथे केली. Satish Sawant On Narayan
पंतप्रधान ग्रामसडक योजना कार्यालयात रखडलेल्या कामांच्या निविदा प्रक्रियेसंदर्भात अधिकार्यांना जाब विचारण्यासाठी आ. वैभव नाईक यांच्यासोबत सतिश सावंत व ठाकरे गटाचे शिष्टमंडळ आले होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कोकण विभागीय सचिव मंदार शिरसाट, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, राजन नाईक आदी उपस्थित होते. Satish Sawant On Narayan
२२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. त्या कार्यक्रमाला चार शंकराचार्यांनी उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले नाही. त्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी मंत्रा राणे यांना प्रश्न विचारला असता त्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री राणेंनी शंकराचार्यांचे हिंदु धर्मींयासाठी योगदान काय? शंकराचार्य जर अयोध्येतील उद्घाटन कार्यक्रमाला विरोध करत असतील. तर तो विरोध राजकीय हेतुने आहे, असे ते म्हणाले होते.
हेही वाचा