मोटार झाडाला धडकून अपघात; युवतीचा मृत्‍यू
मोटार झाडाला धडकून अपघात; युवतीचा मृत्‍यू

सिंधुदुर्ग : भरधाव मोटार झाडाला धडकून अपघात; युवतीचा मृत्‍यू, २ जण जखमी

Published on

सावंतवाडी ; पुढारी वृत्‍तसेवा गोव्यातून न्यू इयर सेलिब्रेशन आटोपून कुडाळकडे परत जाणारी भरधाव मारुती सुझूकी कार झाडाला धडकली. या भीषण अपघातात कुडाळ पिंगुळी येथील ऐश्वर्या महेश कवठणकर (वय 21) या युवतीचा मृत्‍यू झाला. कारमधील उर्वरित दोन युवक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर ओरोस जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज (सोमवार) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलगाव फौजदारवाडी येथे हा अपघात झाला.

कुडाळ-पिंगुळी येथील युवती आपल्या मित्रांसमवेत गोवा येथे न्यू ईयर सेलिब्रेशन करण्यासाठी गेले होते. तेथून पहाटे परत निघत असताना मारुती सुझुकी कारवरील चालक युवकाचा ताबा सुटला व कार महामार्गवरील कोलगांव फौजदारवाडी येथील आंब्याच्या झाडाला येऊन जोरात धडकली. हि धडक एवढी जबरदस्त होती कि, कारमध्ये पाठीमागे बसलेल्या युवतीचा मृत्यू झाला. ऐश्वर्या महेश कवठणकर (२१, रा. पिंगुळी उत्कर्षनगर, ता. कुडाळ) असे तिचे नाव आहे. तर तिच्यासोबतचे दोन युवक देखील या अपघातात जखमी झाले आहेत. सिद्धांत अशोक बांदेकर ( बाजारपेठ  कुडाळ) व साहील तेंडोलकर रा. तेंडोली) अशी जखमींची नावे आहेत. हि कार सिद्धांत बांदेकर याच्या मालकीची असून, तो कार चालवत होता.

या अपघाताची माहिती समजताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्‍टरांनी गंभीर जखमी ऐश्वर्या हीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. कुडाळ येथील समीर वाळके  यांना अपघाताची माहिती देण्यात आली. त्यांनी ऐश्वर्याचे वडील महेश कवठणकर यांना तातडीने माहिती दिली. त्यांनी आपल्या नातेवाईकांसह घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news