Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर भाजपचाच अधिकार; केंद्रिय मंत्री राणे | पुढारी

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर भाजपचाच अधिकार; केंद्रिय मंत्री राणे

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : सन 2024 च्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काउंटडाऊन सुरू झाले असताना सर्वच पक्षाने उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातही सत्ताधारी व विरोधक उमेदवारीची चाचपणी करत आहेत. याच पार्श्वभुमीवर विकासित भारत यात्रेच्या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्गात आलेल्या केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचाच अधिकार आहे. त्यामुळे आमचाच उमेदवार असेल व तो शंभर टक्के जिंकेल असा विश्वास केंद्रिय मंत्री ना. नारायण राणे यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग दौर्‍यावर असलेल्या केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी कुडाळ येथील भाजपा कार्यालयात आपल्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली. तसेच विकास कामांबाबत तालुक्यातील सरपंचांची निवेदने स्विकारली. यावेळी माजी आ. राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजु परब, दिपलक्ष्मी पडते, कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दादा साईल, दिपक नारकर, विकास कुडाळकर, रूपेश कानडे आदिसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ना. राणे यांनी रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारला असता ना. राणे म्हणाले की, रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीबाबत अद्याप कोणाच्याही नावाची चर्चा झालेली नाही. तसेच या मतदार संघात महायुतीत उमेदवारीवरून कोणतीही कुस्ती नाही, खो-खो नाही आणि कबड्डीपण नाही. आमच्याकडे उमेदवारीवरून जे काही होईल ते सामोपचारानेच होईल. महायुतीचा जो उमेदवार येईल तो शंभर टक्के जिंकेल आणि  खासदार आमचाच असेल. आता जे टिवटिव करत आहेत त्यांची टिवटिव बंद होईल. असे कुणाचेही नाव न घेता विरोधकांवर निशाणा साधला. तसेच रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघावर भाजपच अधिकार सांगेल असे आत्मविश्वासाने सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम मावसारी होता असं  वक्तव्य केल याकडे तुम्ही कसं पाहता? असे विचारले असता ना. राणे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड व मातोश्रीवर बोलायचं नाही, सत्ता गेल्यामुळे ते घसरलेले आहेत. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी आमच्या देवतांबद्दल बेालण्याचं धाडस करू नये बाकी कोणाच्याही बद्दल त्यांनी बोलाव. आमच सरकार ज्यांच्यावर काँग्रेसच्या राजवटीपासून आरोप आहेत, त्यांच्यावर ईडी किंवा सीबीआय मार्फत कारवाई सुरू आहे. माजी मंत्री अनिल देशमुख हे काही साधु संत नव्हते, महिन्याला पैसे मागत होते. त्याचे पुरावे मिळालेले आहेत. जडेजांना अटक झाली आणि जे आतमध्ये जाण्यासाठी वेटिंगवर आहेत त्यांना विचारा त्यांचे व्यवसाय काय होते? ईडीकडे या सर्वांची माहिती आहे. ईडीच्या कारवाई प्रश्नी जेष्ठ नेते शरद पवार यांना वाईट वाटण्याच कारण काय? ते दिल्लीत असताना कधी याबाबत बोलायच नाही. आम्ही विरोधक म्हणुन पाहत नाही, ज्यांनी आरोप केला त्याच्या विरूध्द ईडीची कारवाई आहे. महानंदा प्रकल्पाबाबत संजय राऊत यांनी आरोप केल्याबद्दल ना. राणे यांना विचारले असता महानंदा कंपनीच्या कामगारांना गेली सहा महिने पगार नाही. त्यासाठी मी प्रस्ताव ठेवलाय की, एनडीपी डेअरची मोठी कंपनी आहे. त्याने महानंदा घेवून चालवावी म्हणजे नोकर्‍या शाबुत राहून कंपनीही तिथेच राहिल कंपनी जाणार नाही, पण गुजरात मध्ये एनडीपीची मेन शाखा आहे. ती ऑलइंडिया बेसवर आहे. त्यांनी ही कंपनी घेवून चालवावी जेणेकरून कामगारांच्या नोकर्‍या शाबुत राहतील असे सांगितले.

Back to top button