TET Exam: उशिरा आल्याने फाटक हायस्कूलमध्ये परीक्षेसाठी प्रवेश नाकारला | पुढारी

TET Exam: उशिरा आल्याने फाटक हायस्कूलमध्ये परीक्षेसाठी प्रवेश नाकारला

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

एसटी संपाचा फटका शिक्षक पात्रता परीक्षेला येणाऱ्या भावी शिक्षकांना बसला आहे. परीक्षा केंद्रावर वेळेत न आल्याने अनेक परीक्षार्थींना परीक्षेला बसायला देण्यात आले नाही. हा प्रकार रत्नागिरी शहरातील फाटक हायस्कूलच्या केंद्रावर घडला.

एसटी नसल्यामुळे आमची गैरसोय झाली. त्यामुळे वेळेत येता येणे शक्य झाले नाही, आम्हाला परीक्षेला बसुद्या. आमचे नुकसान करू नका अशी आर्जव या परीक्षार्थींनी केंद्राच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे केली. मात्र त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे भावी शिक्षकांनी संताप व्यक्त केला.

रविवारी 21 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा होत आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा सम्प असल्याने अनेकांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचता आले नाही. अनेकांनी खासगी वाहनाने परीक्षा केंद्र गाठले. मात्र एसटी नसल्याने अनेकांची गैरसोय झाली.

Back to top button