रायकीय हाय होल्टेज : जावळी सोसायटी मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण | पुढारी

रायकीय हाय होल्टेज : जावळी सोसायटी मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण

कुडाळ ; पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे धुमशान संपूर्ण जिल्हाभर होत असतानाच जावळी तालुका सोसायटी मतदारसंघाची निवडणूक संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरत आहे. यातच राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या विरोधात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे ज्ञानदेव रांजणी यांची लढत लक्षवेधी ठरली आहे.

49 सोसायटी मतदार संघांमध्ये आज प्रत्यक्ष मतदान

49 सोसायटी मतदार संघांमध्ये आज प्रत्यक्ष मतदान केंद्रावर दोन्ही उमेदवारांच्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. दहा वाजण्याच्या आतच सोसायटी मतदार संघाच्या संपूर्ण मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

यातच आठच्या सुमारास राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या बरोबर असणाऱ्या मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला.

त्यानंतर तब्बल एक तासानंतर गेल्या दीड महिन्यापासून सहलीवर असणारे ज्ञानदेव रांजणे यांच्या सोबत असणाऱ्या समर्थक मतदारांनी एकाच वेळी मेढा प्राथमिक शाळेत मतदार केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी ज्ञानदेव रांजणे यांच्या सगळ्या मतदारांनी डोक्यावर पांढर्‍या टोप्या व पांढरा मास्क परिधान केला होता. एकेक करून ज्ञानदेव रांजणे यांचे मतदार रांगेत उभा राहून मतदान करत होते.

यावेळी आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, राष्ट्रवादीचे पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांच्या उपस्थितीत ज्ञानदेव रानडे यांचे 11 एकेक मतदार मतदान मतदान केंद्रात मतदान करून बाहेर येत होते.

साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सर्व 49 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

प्रत्यक्ष मतदाना दिवशी सकाळी साडेसात वाजता आमदार शशिकांत शिंदे व जावळीतील उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी स्वतः मतदान करून मतदानाला सुरुवात केली.

त्यानंतर सुमारे 8 वाजण्याण्याच्या सुमारास आमदार शशिकांत शिंदे यांच्या विचाराच्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांच्या समर्थक मतदारांनी मतदानाचा सुरुवात केली.

अंदाजे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सर्वच्या सर्व 49 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि या जावळी सोसायटी मतदार संघासाठी शंभर टक्के मतदान पूर्ण झाले.

यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी व मतदारांनी आपापल्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी जाणे पसंत केले. आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेत सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मतदानाला अंदाजे साडेआठच्या सुमारास घडलेल्या घटनेने काहीसे गालबोट लागले. यावेळी आमदार शिंदे यांचे मोठे बंधू ऋषिकांत शिंदे तसेच आमदार शिंदे यांचे सुपुत्र तेजस शिंदे यांनी मतदान केंद्रावर उपस्थित होताच ज्ञानदेव रांजणे यांचे समर्थक व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी आमने-सामने येऊन दोन्ही गटात यावेळी हमरीतुमरी झाली.

निवडणुकीला काहीसे गालबोट

या सर्व प्रकारामुळे आजच्या निवडणुकीला काहीसे गालबोट लागले. यावेळी झालेल्या हमरीतुमरीत प्रतापगड कारखान्याचे संचालक मालोजीराव शिंदे व तेजस शिंदे यांच्यात अरे तुरे ची भाषा ही झाली.

यामुळे काही काळासाठी वातावरण कमालीचे तंग झाले, मात्र परिस्थितीचे भान राखून आमदार शशिकांत शिंदे व उमेदवारी मान्यवरांनी दोघांनीही या यावेळी मध्यस्थी करून आपल्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही काळासाठी पोलिसांकडूनही धरपकड करण्यात आली.

सातारा जिल्हा बँक निवडणूक : आमदार शशिकांत शिंदे व ज्ञानदेव रांजणे यांच्या गटात हमरीतुमरी

आमदार शशिकांत शिंदे यांनी कोणत्याही परिस्थितीत माझा विजय निश्चित असल्याचे दावा केला असतानाच, ज्ञानदेव रांजणी यांनीही चांगल्या मताधिक्‍याने निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. दोन्ही गटाच्या दाव्या प्रती दाव्यांमुळे उद्याच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

निकालाने जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा

मतदारांनी आपला हक्क बजावला असून त्यांची मते मतपेटीत बंद झालेले आहेत. मतदारांनी खरा कौल कोणाला दिला हे 23 तारखेला होणाऱ्या निकालात स्‍पष्‍ट होणार आहे. या निकालावर केवळ जावळी तालुक्यातील नव्हे तरी जिल्ह्याच्या राजकारण ची दिशा ठरणार आहे.

जावली मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः या मतदारसंघासाठी लक्ष दिले असल्यामुळे या निवडणुकीकडे व या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Back to top button