Nilesh Rane : निलेश राणे लोकसभा निवडणूक लढवणार का? पोस्ट चर्चेत | पुढारी

Nilesh Rane : निलेश राणे लोकसभा निवडणूक लढवणार का? पोस्ट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते आणि मंत्री नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे पुन्हा एकदा त्यांच्या राजकीय भूमिकेवरुन चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवर पोस्ट करत आपण निवडणूक लढवणार की नाही याबद्दल स्पष्ट केले आहे. यावरुन पुन्हा एकदा राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. (Nilesh Rane)

मी २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक?

निलेश राणे यांनी आपल्या  ‘X’ वर पोस्ट करत म्हटलं आहे की,”मी २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नाही हे स्पष्ट करतो, या आधी अनेक वेळा स्पष्ट केलं आहे आज परत करतो कारण आज एका चॅनलवर ही बातमी मी बघितली. मी सध्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात पक्षाचे काम करतोय आणि तिथेच करत राहणार. धन्यवाद.”

Nilesh Rane : राजकारणातील निवृत्तीची पोस्ट झाली होती व्हायरल

निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे याआधी जाहीर केले होते. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होत की,
“नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.
मागच्या १९/२० वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे. मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!”

हेही वाचा 

Back to top button