Kashedi Tunnel : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा सुरु; लहान वाहनांना परवानगी, एसटी-बससाठी एक-दोन दिवसात निर्णय | पुढारी

Kashedi Tunnel : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा सुरु; लहान वाहनांना परवानगी, एसटी-बससाठी एक-दोन दिवसात निर्णय

खेड; पुढारी वृत्तसेवा : कोकण मार्गावर कशेडी बोगद्याच्या एका मर्गिकेचा लहान वाहनांसाठी वापर सुरू  झाला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज (दि. १२) बोगद्याच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आगामी एक ते दोन दिवसात याच मर्गिकेवरून एसटी व खासगी आराम बसला देखील परवानगी देता येईल का, याचा विचार करत असल्याचे सांगितले. (Kashedi Tunnel)

मुंबई-गोवा महामार्गावरून गणेशोत्सव काळात प्रवास करणाऱ्यांसाठी आता कशेडी बोगदा (Kashedi Tunnel) हा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. सोमवारी (दि. ११) बोगदा लहान वाहनांना कोकणात येण्यासाठी खुला करण्यात आला, तर आज (दि. १२) सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ना. चव्हाण म्हणाले, सध्या हलकी वाहने बोगद्यातून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान चव्हाण यांनी एसटी व खासगी आराम बस यामुळे घाटात वाहतूक कोंडी होईल का हे तपासण्याच्या सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानंतर आगामी एक ते दोन दिवसांमध्ये याबाबतीत सकारात्मक निर्णय घेता येईल असे त्यांनी यावेळी जाहीर केले.

हेही वाचा

Back to top button