Monsoon Update : आज पासून विदर्भात मान्सून सक्रीय; पुढील ४८ तासांत संपूर्ण राज्य व्यापणार | पुढारी

Monsoon Update : आज पासून विदर्भात मान्सून सक्रीय; पुढील ४८ तासांत संपूर्ण राज्य व्यापणार

आशिष देशमुख

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात बुधवार पासून मान्सून सक्रीय होत आहे. सुरुवातील तो विदर्भात येईल त्यानंतर ४८ तासांत संपूर्ण राज्यात त्याचा प्रभाव वाढणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवात माेठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात तीव्र झाल्याने जम्मू कश्मीर पासून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश पर्यंत पावसाला सुरुवात झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्याने ही दक्षिण भारतात पाऊस वाढणार आहे.

बंगालच्या उपसागरापासून आंध्र प्रदेश किनार पट्टी पर्यंत द्रोणीका रेषा तयार झाली आहे. त्यामुळे हा पाऊस महाराष्ट्रात वाढणार आहे. बुधवार दि.१३ पासून विदर्भात हलका ते मध्यम पावसाला सुरुवात हाेईल. गुरुवारपासून विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल. शुक्रवारपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यानंतर पुन्हा १७ ते १९ आणि पुढे १९ ते २३ सप्टेंबर पर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याच कालावधीत गणपतीचे आगमन आहे.

या भागात राहणार जोर

  • विदर्भ : १३ पासून सुरुवात,१४ ते १७ मुसळधार
  • मध्य महाराष्ट्र : १५ पासून सुरुवात
  • कोकण : १५ पासून सुरुवात
  • घाट माथा : १६ व १७ रोजी; पुणे, नाशिक, सातारा (मुसळधार)
  • मराठवाडा : १६ पासून सुरुवात

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे रा्यात मान्सून तीव्र होत आहे. आगामी २४ तासांत तो विदर्भातून सुरु होईल आणि त्यानंतर ४८ तासांत म्हणजे १४ ते १६ दरम्यान तो संपूर्ण राज्यात सक्रीय होईल.

-अनुपम कश्यपी,हवामान विभाग प्रमुख,पुणे वेधशाळा

हेही वाचा

पारगावच्या रस्त्यावरील अपघात थांबेना ; दुचाकीस्वार चिखलात पडून जखमी

पुणे : नशेसाठी मोबाईल चोरी करणारा गजाआड

खेड शिवापूर टोलनाक्यावर ट्रकसह 65 लाखांचा गुटखा जप्त

Back to top button