सिंधुदुर्ग: देवगड तालुक्यात एकाच दिवशी आढळले दोन महिलांचे मृतदेह

सिंधुदुर्ग: देवगड तालुक्यात एकाच दिवशी आढळले दोन महिलांचे मृतदेह


देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात आज (दि.६) सकाळी एकाच दिवशी दोन महिलांचे मृतदेह सापडले.15 दिवसांपूर्वी बिघडलेल्या मनःस्थितीत घरातून निघून गेलेल्या बापर्डे येथील प्रतिभा प्रकाश दुसनकर (वय 55) या महिलेचा सडलेला मृतदेह सकाळी बापर्डे डोकांबा ओहोळात आढळला.

तर टेंबवली येथील प्रतिभा प्रदीप बापार्डेकर (वय 50) ही महिला शनिवारी दुपारी 3 च्या सुमारास घरातून कामासाठी बाहेर गेली होती. ती सायंकाळी घरी आली नाही म्हणून मुलगा तुषार यांनी शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. सकाळी शोध घेतला तरीही न मिळाल्याने पोलिस स्टेशनमध्ये खबर देण्यासाठी गेला होता.

दरम्यान माजी नगरसेवक उमेश कणेरकर यांनी मळई खाडीत एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे सांगितल्यानंतर पोलीस घटनास्थळी तात्काळ गेले. त्यानंतर पोलिसांनी तुषार बापार्डेकर यांना बोलावून घेऊन मृतदेहाची ओळख पटवली. त्यावेळी त्यांनी मृतदेह आपल्या आईचा असल्याचे सांगितले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news