सिंधुदुर्ग : वीजेचा शॉक लागून वायरमनचा मृत्यू; नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेरले | पुढारी

सिंधुदुर्ग : वीजेचा शॉक लागून वायरमनचा मृत्यू; नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेरले

कुडाळ, पुढारी वुत्तसेवा : महावितरणचे आऊटसोर्सिंग कर्मचारी धनंजय फाले यांचा उपचारादरम्यान गोवा -बांबुळी येथे मुत्यू झाला. या पाश्वभूमीवर फाले कुटुंबियांना भरीव मदत मिळावी, यासाठी कुडाळ मधील सर्वपक्षीयांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना त्यांच्याच चेंबरमध्येच घेरत प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी काही प्रश्नावर अधिक्षक अनुत्तरित झाल्याने उपस्थित नागरिकांनी त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. अखेर आक्रमक नागरीकांचा रेटा पाहून विनोद पाटील यांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात दिले.

 याबाबतची माहिती अशी की,  कुडाळ शहरातील गवळदेव मंदीर नजिकच्या अभिमन्यू हॉटेल समोरील वीज वितरण कंपनीच्या वीज पोलावर दुरुस्तीचे काम सुरु होते. काम करत असताना वीज वाहीनीचा शॉक लागून वीज वितरण कंपनीचे कंत्राटी वायरमन धनंजय बाबू फाले (रा. महादेवाचे केरवडे) हे गंभीररित्या जखमी झाले. त्यानंतर त्यांच्यावर गोवा -बांबुळी येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचे निधन झाले. त्यामुळे कुडाळ मधील सर्वपक्षीय नागरीकांनी संतप्त होत अधिक्षक अभियंता विनोद पाटील यांचे कार्यालय गाठले. अधिक्षक अभियंता .पाटील कार्यालयीन कामानिमित्ताने बाहेर गेले असल्याने कुडाळ मधील प्रमुख मंडळींनी त्यांच्या सहाय्यक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पण ते अपेक्षित माहिती देवू शकले नाही. दरम्यान या वेळी अधिक्षक पाटील उपस्थित झाले. यावेळी सर्वांनीच आक्रमक भूमिका घेत पाटील यांना धारेवर धरत खडेबोल सुनावले.

 यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अभय शिरसाट, राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे काका कुडाळकर, व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट, मनसे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, तालुकाप्रमुख राजन नाईक, राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे भास्कर परब,वीज वितरण कंत्राटी अशोक सावंत, दादा साईल,वर्षा कुडाळकर, संदेश पडते, सागर रणसिंग, मंदार शिरसाट, बंटी तुळसकर, रत्नाकर प्रभु, सर्वेश पावसकर, दिपक गावडे आदी उपस्थित होते.

हेही वाचंलत का?

Back to top button