सिंधुदुर्ग: लाटांच्या तडाख्याने उत्तरवाडा किनारपट्टीची मोठी धूप | पुढारी

सिंधुदुर्ग: लाटांच्या तडाख्याने उत्तरवाडा किनारपट्टीची मोठी धूप

देवगड; पुढारी वृत्तसेवा : समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने देवगड तालुक्यातील तांबलडेग उत्तर वाडा येथील किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. तर रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील वस्तीतील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.

लाटांच्या तडाख्याने यापूर्वीही या गावच्या दक्षिण वाडा भागाला मोठा फटका बसला होता. तीन वर्षापूर्वी ऑगस्ट महिन्यात लाटांच्या तडाख्याने गावची स्मशानभूमी गडप झाली होती. तर किनारा लगत असलेला मासळी सुकविण्याचा ओटा कोसळला होता.
या दोन दिवसांत याच गावच्या उत्तर वाडा किनारपट्टी भागाला लाटांचा तडाखा बसला आहे. रमेश सनये यांच्या घराजवळील साई मंदिरानजिक असलेल्या रस्त्यापर्यंत पाणी आले. पाण्यामुळे रस्त्याचा अर्धा भाग वाहून गेला असून ३ माडाची झाडे कोसळली आहेत. लाटांच्या तडाख्याने समुद्राचे पाणीही मार्ग काढत वस्तीच्या दिशेने सरकू लागल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. किनारपट्टी लगत कायमस्वरुपी धूप प्रतिबंधक बंधारा घालण्याची मागणी होऊ लागली आहे.

हेही वाचा  

Back to top button