‘विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी ढासळतेय’, संवर्धनाची मागणी | पुढारी

'विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी ढासळतेय', संवर्धनाची मागणी

विजयदुर्ग : सचिन लळीत – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेल्या देवगडमधील विजयदुर्ग किल्ल्याची गेले काही वर्षे तटबंदी ढासळत आहेत. दोन वर्षापूर्वी विजयदुर्ग किल्ल्याचा दर्या बुरुजाच्या समुद्राकडील खालील बाजूची तटबंदी सतत होत लाटांच्या मारांमुळे ढासळली आहे. आजवर पाहता विजयुदर्ग किल्ल्याची तटबंदी ढासळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यातच त्याकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष होत असून स्थानिक लोकप्रतिनिधींसह राज्य पातळीवरील नेते मंडळीनी पाहणी दौरा करण्यापुढे आजवर ठोस काम सुरू होईल असे कोणत्याही पाऊल उचलेले नाही. यामुळेच आज स्थानिकांसह पर्यटकांकडून विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनाची व ढासळेल्या तंटबंदीची तातडीने बांधणी व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

विजयदुर्ग किल्ल्याच्या पश्चिम बाजूला म्हणजेच समुद्राकडील बाजूला दर्या बुरुज तटबंदी समुद्राच्या लाटांमुळे तटबंदीचा काहीसा भाग खालून कोसळला असून समुद्राच्या लाटांमुळे भविष्यात संपूर्ण तटबंदी ढासळण्याचा धोका उद्भवू शकतो. विजयुदुर्ग किल्ला हा एक एैतिहासिक किल्ला असून या किल्ल्यावरती दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. सतत होणारी पडझड पाहता भविष्यात या किल्ल्याचं नाव असेल. मात्र प्रत्यक्षात किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भीती किल्ल्याप्रेमींनी व्यक्त करत आहेत. दोन वर्षापूर्वी विजयदुर्ग किल्ल्याच्या तुटक्या बुरजाजवळील तटबंदी ढासळलेली होती. यावेळी अनेक राजकीय लोकांनी व लोकप्रतिनिधींची पाहणी करुन सदर किल्ल्याची डागडुजी केली जाईल, असे आश्वासन देखील दिले होते. मात्र या किल्ल्याची पाहणी करायला आलेले लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी कोणताही आवाज उठविला नसल्याने आजपर्यंत त्या बुरुजाची डागडुजी केलेली नाही.

माजी खासदार संभाजीराजे यांनीही विजयदुर्ग किल्ल्याची दोन वर्षापुर्वी तटबंदी ढासळली. त्यावेळी प्रत्यक्ष येवून पाहणी केली होती. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जलदुर्ग व आरमाराचे महत्त्व किती पूर्वीचे ओळखले होते, याच्या विविध दाखल्यांपैकी विजयदुर्ग किल्ला हा आदर्श उदाहरण आहे. मात्र, वर्षानुवर्षे लाटांचे तडाखे खाल्ल्यानंतरही दिमाखात उभे राहिलेले हे जलदुर्ग सरकारी अनास्थेमुळे आता ढासळत चालले आहेत.

शिवछत्रपतींनी पुनर्बांधणी करून घेतलेल्या आणि मराठा आरमाराच्या प्रमुख शक्तीकेंद्रापैकी एक ‘विजयदुर्ग’ आहे. या किल्ल्याची तटबंदी अन् बुरुजाचा भाग ढासळत आहे. हे माजी खासदार संभाजीराजे यानी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांना भेटून ‘गडाची सद्य:परिस्थिती लक्षात आणून दिले. लवकर तटबंदी आणि बुरुज यांचे काम चालू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी’, अशी मागणी केली होती. मात्र अद्यापपर्यंत या किल्ल्याच्या तटबंदीच्या दुरूस्तीचे काम सुरू झाले नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

विजयदुर्ग किल्ल्यावर १६५३ पासून १८१८१ पर्यंत मराठ्यांचे वर्चस्व होते. विजयदुर्ग किल्ला ८२० वर्ष प्राचीन आहे. हा किल्ला इ. स. ११९३ ते १२०६ मध्ये राजा भोज यांनी बांधला. कारण त्यावेळी राजा भोज यांचे कोकण प्रांतावर वर्चस्व होते. या किल्ल्यावर विजयनगराचे सम्राट, बहामनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशहाने राज्य केले. १६५३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्यावर हल्ला करून हा किल्ला आदिलशहाकडून आपल्या ताब्यात घेतला. विजयदुर्ग किल्ल्याला पूर्वीच्या काळी घेरीया या नावाने ओळखले जायचे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकण्याच्या अगोदर पाच एकरच्या क्षेत्रफळा मध्ये वसलेला होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला तटबंदी वाढवून या किल्ल्याचे क्षेत्रफळ १७ एकर केले.

सध्या १७ एकरवर किल्ला आहे. मात्र, त्याची पडझड होत आहे. विजयदुर्ग किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे. या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने जमीन आहे. जमिनीवरून किल्ल्यामध्ये प्रवेश करता येतो. ३० मीटर उंच खडकावर या किल्ल्याची तटबंदीची भिंत ३०० फूट उंच आहे. किल्ल्याची भिंत १० मीटर उंच आहे.

समुद्राच्या जवळची तटबंदी म्हणजे पडकोट खुश्की, दुसरी तटबंदी बुराजांच्या भोवती आणि तिसरी तटबंदी किल्ल्याच्या भोवती आहे. अशा तीन तटबंदी या किल्ल्याला आहेत. याचमुळे अशाच या ऐतिकासिक वास्तूची जतन होणे गरजेचे असल्याने विजयदुर्ग किल्ल्याची ठासळेली तटबंदी बरोबर संपूर्ण किल्ला परीसराचा कायापालट झाल्यास विजयदुर्ग किल्ल्यासह परीसरातील पर्यटनात्मक विकास होण्यास मदत होणार आहे.

Back to top button