पक्षाविरोधात ‘उठाव’ करणारे काँग्रेसचे १८ नगरसेवक अपात्र! मुख्यमंत्री शिंदे यांचा निर्णय

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे
Published on
Updated on

भिवंडी : संजय भोईर : गद्दारी, उठाव आणि मुत्सद्दीपणा हे शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या परवलीचे झाले असतानाच भिवंडीतील १८ नगरसेवकांचा उठाव त्यांना सहा वर्षांच्या निवडणूक बंदीकडे घेऊन गेला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत 'उठाव' करून काँग्रेसचा पक्षादेश डावलून विरोधी कोणार्क आपाडीच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या १८ तत्कालीन नगरसेवकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपात्र ठरवले आणि त्यांच्यावर सहा वर्षासाठी निवडणूक लढविण्याची बंदीही घातली आहे.

हा निकाल काँग्रेसच्या तत्कालिन नगरसेवकांबाबत असला तरी त्याचा फटका मात्र आता राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसला आहे. कारण या नगरसेवकांनी 'उठावानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता या निकालामुळे या सर्व १८ जणांना डिसेंबर २०२७ पर्यंत कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही.

अपात्र कसे ठरवले

यामध्ये कोकण आयुक्तांचे आदेश खारीज करत १८ माजी नगरसेवकांना महाराष्ट्र महानगरपालिका सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ कलम ३ (१) (ब) अन्वये अपात्र घोषित करण्यात आले आहे. ३१ डिसेंबर २०२१ पासून ते पुढे ६ वर्षाच्या कालावधीसाठी या सदस्यांना अपात्र ठरविण्यात येत आहे, असा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

नार्वेकरांकडे लक्ष

नगरविकासमंत्री या नात्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी सुनावणी दरम्यान हा निर्णय दिल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित असलेल्या १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण चर्चेत आले. शिवसेनेत उठाव करून भाजपसोबत सरकार स्थापन करणाऱ्या या आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घटनापीठाने नार्वेकर यांच्यावर सोपवला आहे.

असा घडला 'उठाव'!

भिवंडी महापालिकेच्या २०१७ मधील सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसने ९० पैकी ४७ जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळविले. त्या खालोखाल भाजप १९, शिवसेना १२. कोणार्क विकास आघाडी ४, रिपाई एकतावादी ४, समाजवादी पार्टी २, अपक्ष २ आणि भाजप समर्थक आणि भाजप बंडखोर असे दोन मिळून नगरसेवक पान १ वरून जिंकून आले होते. पूर्ण बहुमत असताना काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेऊन महापौर काँग्रेसचा आणि उपमहापौरपद शिवसेनेला देत सत्ता प्रस्थापित केली. अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर ५ डिसेंबर २०१९ रोजी पुन्हा महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक लागली.

महापौरपदासाठी कॉंग्रेसने रशिका राका व उपमहापौरपदासाठी शिवसेनेने बाळाराम चौधरी यांना उमेदवारी दिली. काँग्रेस गटनेते हलीम अन्सारी यांनी पक्षाच्या सर्व सदस्यांना व्हीप बजावून दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याची रणनीती आखली होती. महापौर पदासाठी कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील उभ्या होत्या. उपमहापौर पदासाठी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली व इम्रान वली खान यांनी आघाडीकडून उमेदवारी दाखल केली.

काँग्रेसच्या या निर्णयानंतर काँग्रेस गटात आनंदाचे वातावरण पसरले असून विजय नेहमी सत्याचाच होत असतो. न्याय मिळायला उशीर झाला पण तो सत्याच्या बाजूने मिळाला. भविष्यात पक्षाविरोधात बंडखोरी करणाऱ्यांना यातून मोठा धडा मिळाला आहे.

-जावेद दळवी, माजी महापौर भिवंडी मनपा

१८ नगरसेवकांनी 'उठाव' करून कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करून कॉंग्रेसचा अधिकृत उमेदवार पाडला. या बंडखोरी विरोधात काँग्रेस नेते जावेद दळवी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करून 'त्या' १८ नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची मागणी केली. कोकण विभागीय आयुक्तांनी बंडखोरांच्या बाजूने निकाल दिल्याने त्यांचे सदस्यत्व वाचले होते. दरम्यानच्या काळात काँग्रेसच्या या बंडखोर १८ नगरसेवकांनी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्यात शिवसेनेत उठाव होऊन सत्तांतर होताच दळवी यांनी आयुक्तांच्या आदेशाविरोधात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अपील केले.

या १८ काँग्रेस बंडखोरांचे सदस्यत्व रद्द पुढील ६ वर्ष निवडणूक बंदी

नमरा औरंगजेब अन्सारी (वॉर्ड नं. २ अ),
मीसबाह इमरान खान (वॉर्ड नं. २ ब)
इमरान वाली महोम्मद खान ( वॉर्ड नं. २ क )
एहमद हुसेन मंगरु सिद्दीकी ( वॉर्ड नं. २ ड)
अरशद मोहम्मद अन्सारी ( वॉर्ड नं. ४ अ)
शबनम मेहबूब रेहमान अन्सारी ( वॉर्ड नं. ४ ब )
अन्जूम एहमद हुसेन सिद्दीकी ( वॉर्ड नं. ४ क)
मलीक नजीर मोमीन ( वॉर्ड नं. ५ अ)
झरीना नफीज अन्सारी ( वॉर्ड नं. ५ ब)
सजीदा मोमीन ( वॉर्ड नं. ७ अ)
शकीरा एहमद शेख ( वॉर्ड नं.८ ब)
समीना सोहेल शेख ( वॉर्ड नं. ८ क )
रबीया मोहम्मद शमीम अन्सारी ( वॉर्ड नं. ९ सी)
तफज्जुल हुसेन मकसूद हुसेन अन्सारी ( वॉर्ड नं. ९ ड)
शीफा अशफाक अन्सारी ( वॉर्ड नं. १० ब)
नसरुल्ला नूर मोहम्मद अन्सारी ( वॉर्ड नं. ११ ड)
हुस्ना परवीन मोहम्मद याकूब अन्सारी ( वॉर्ड नं. १४ ब)
मतलूब अफजल खान ( वॉर्ड नं. १४ ब)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news