तळेगाव स्टेशन : अग्नीशमन विभागास दुर्घटना टाळण्यास मिळाले यश | पुढारी

तळेगाव स्टेशन : अग्नीशमन विभागास दुर्घटना टाळण्यास मिळाले यश

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा :  मावळ तालुक्यातील मुंबई-पुणे महामार्गाजवळील उर्से रोड येथील ओम साई एंटरप्राईज प्लॅस्टिक पासून ऑइल तयार करणा-या कंपनीत योग्यवेळी केमिकल गळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. कंपनीत सोमवारी(दि.२६) रात्री साधारण १०.३०वा. च्या सुमारास लाईट गेल्यामुळे कुलर बंद झाला. नंतर प्रेशर वाढून तापमान वाढल्याने कंटेनरचा ग्लास फुटून वायू व मटेरियल गळती सुरु झाली. पाईप लीक होवून गॕस बाहेर आला अशी माहिती समोर आली. या घटनेमुळे परिसरात धुराचा प्रचंड लोट दिसल्यामुळे केमिकल वाहणारा कंटेनर पलटी झाला असावा असे सुरवातीस वाटले होते.

परिसरात धूर पसरलेला असल्यामुळे आणि केमिकलच्या वासामुळे वाहन चालवणे देखील अवघड होते. अशा परिस्थितीमध्ये एमआयडीसी अग्नीशमन विभाग तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषद अग्नीशमन विभागा,आपदा मित्र वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अनेक सदस्य वायु गळतीच्या ठिकाणी पोहोचले. ओम साई कंपनीमध्ये केमिकल गळतीवर अंधार असतानाही नियंत्रण मिळवून मोठी दुर्घटना टाळली.

यावेळेस एमआयडीसी अग्निशमन विभागाचे दिपक दोरुगडे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे शेखर खोमणे, आपदा मित्र मावळ व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, सर्जेस पाटील , गणेश ढोरे ,शुभम काकडे, प्रशांत शेंडे,कुनाल दाभाडे विनय सावंत तेथे गेले होते.या कंपनीला वीजेची सतत आवश्यकता असताना वीज गेल्यानंतर पर्यायी व्यवस्था का नव्हती असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

हे ही वाचा :

पुढारी विशेष : हिंगोलीच्या हळद संशोधन केंद्रात 32 वाणांवर संशोधन; केरळ, मेघालयाच्या बेण्याची प्रायोगिक तत्‍वावर लागवड

नाशिक : परप्रांतीय विवाहितेच्या खूनाचा उलगडा, संशयित गजाआड

Back to top button