वंदे भारत एक्स्प्रेसचा उद्या गोवा-मडगांव मध्ये शुभारंभ! | पुढारी

वंदे भारत एक्स्प्रेसचा उद्या गोवा-मडगांव मध्ये शुभारंभ!

मडगांव : प्रमोद म्हाडगुत : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ गोव्यात मडगांव येथे मंगळवार दिनांक २७ जून रोजी सकाळी १० वाजता होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भोपाळमधून व्हिडीओ कॉन्फरन्ससिंगद्वारे या रेल्वेचे झेंडा दाखवून उद्घाटन करणार आहेत, त्यासाठी गोवा -मडगांव येथे रेल्वे प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी सुरू केली आहे.

ओडिशामधील भीषण रेल्वे अपघातानंतर गोवा-मडगांव येथील नियोजित वंदे भारतच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.आता मंगळवार दि.२७ जुन २०२३ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यासाठी गोवा-मडगांव जंक्शन येथे रेल्वे प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे.

सद्यस्थितीत कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या प्रिमियम ट्रेन मधून ३ ट्रेन थांबत आहेत,त्यात राजधानी एक्सप्रेस सावंतवाडी येथे आणि तेजस एक्सप्रेस कुडाळ येथे थांबत आहे. आता कणकवली येथे वंदे भारत ही ट्रेन थांबणार आहे.कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रकानुसार वंदे भारत एक्सस्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातील ३ दिवस धावणार आहे. पावसाळी वेळापत्रक संपल्यानंतर मात्र ही गाडी शुक्रवार वगळून आठवड्यातील ६ दिवस धावणार आहे. एकूणच या गाडीची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

-हेही वाचा 

मुंबई : ठाकरे सेनेचे सचिव सूरज चव्हाण यांची ईडीकडून चौकशी सुरु

Chandrashekhar Bawankule | बावनकुळेंचे शरद पवारांसंदर्भात ट्विट, ” मेरा घर- मेरे बच्चे…”

Kolhapur News | उद्योजक संतोष शिंदे मृत्यू प्रकरण : ‘त्या’ दोघांना ३० जूनपर्यंत कोठडी

Back to top button