रत्नागिरी : कोंडगाव येथे कार-दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार ठार; महिला गंभीर | पुढारी

रत्नागिरी : कोंडगाव येथे कार-दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार ठार; महिला गंभीर

साडवली; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव (साखरपा) येथे तवेरा कार-दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. तर पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शुक्रवारी (दि. १६)(  सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील कोंडगाव शिंदेवाडीजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातातील कार ही रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. तर मोटारसायकलस्वार हा कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने निघाला होता. दोन्ही वाहने कोंडगाव येथे आली असता त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर बसलेली महिला गंभीर जखमी झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  गंभीर जखमी महिलेला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने  तातडीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. अपघाताचा पंचनामा करण्याचे काम साखरपा पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, मृत दुचाकीस्वाराची ओळख अद्याप पटलेली नसून त्याची ओळख पटवण्याचे काम पोलीस करीत आहेत.

        हेही वाचलंत का ? 

 

 

Back to top button