रत्नागिरी : ज्ञानेश्वर म्हात्रेंच्‍या विजयानंतर खेडमध्ये विजयी जल्लोष | पुढारी

रत्नागिरी : ज्ञानेश्वर म्हात्रेंच्‍या विजयानंतर खेडमध्ये विजयी जल्लोष

खेड शहर; पुढारी वृत्तसेवा : कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजप -शिंदे गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले. त्यांच्या विजयानंतर खेडच्या तीनबत्ती नाक्यावर भाजप व बाळासाहेबांची शिवसेना गटातर्फे विजयी जल्लोष करण्यात आला.

शिक्षक मतदार संघाचे प्रातिनिधित्व शिक्षकांनीच केले पाहिजे. ६ वर्षानंतर शिक्षकांचा आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या रुपाने झाला असल्याची प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष विजय म्ह्स्के यानी यावेळी दिली. त्यानंतर म्हात्रे यांच्या विजयी घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष अनिकेत कानडे, माजी तालुकाध्यक्ष संजय बुटाला, शिंदे गटाचे शहर प्रमुख कुंदन सातपुते, माजी नगरसेवक राजेश बुटाला, मिनार चिखले, कार्यकर्ते प्रेमळ चिखले, स्वप्निल सैतवडेकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

हेही वाचा: 

 

 

Back to top button