महाराष्ट्राचा वापर इतर राज्यातील निवडणुकांसाठी : आमदार रोहित पवार | पुढारी

महाराष्ट्राचा वापर इतर राज्यातील निवडणुकांसाठी : आमदार रोहित पवार

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्राचा वापर इतर राज्यातील निवडणुकांसाठी होत असल्याचे मत आमदार रोहित पवार यांनी औरंगाबादमध्ये म्हटलं आहे. महाराष्ट्र व्हिजन फोरमच्या कार्यक्रमानिमित्ताने रोहित पवार औरंगाबादमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

गेल्या काही दिवसात इतर राज्यात झालेल्या निवडणुकांसाठी महाराष्ट्र राज्याचा वापर झाला आहे. गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उद्योग तिकडे पळविले, आता आगामी कर्नाटक निवडणूकसाठी सीमावादाचा मुद्दा निर्माण केला गेला. मध्यप्रदेशमधील बाबांचा मुद्दा ही तसा असल्याचे ते म्हणाले.

याशिवाय राज्यात महापुरुषांबाबत चुकीचे वक्तव्य करताय ही गंभीर बाब आहे. येणाऱ्या काळात याचे मोठे परिणाम होईल. राज्यातील विधानसभेत शिस्त राहिली नाही, असे सांगताना पवार म्हणाले की, मुद्देकेवळ व्हिडिओ आणि प्रसारमाध्यमांमध्ये येण्यासाठी मांडले जातात. प्रत्यक्षात संबंधीत विषयावर चर्चा होत नाही. मुद्यांवर सविस्तर बोलायला हवे. परंतु, त्याचा अभाव दिसत आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button