सिंधुदुर्ग : वेंगुर्ल्यातील २१ ग्रामपंचायतींत सरपंच पदासाठी ७५ उमेदवार रिंगणात; २ सरपंच बिनविरोध | पुढारी

सिंधुदुर्ग : वेंगुर्ल्यातील २१ ग्रामपंचायतींत सरपंच पदासाठी ७५ उमेदवार रिंगणात; २ सरपंच बिनविरोध

वेंगुर्ले, पुढारी वृत्तसेवा : वेंगुर्ले तालुक्यात ग्रामपंचायतसाठी १८ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. बुधवारी (दि. ७) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचपदाच्या एकूण १०४ अर्जापैकी २६ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे २ ठिकाणी सरपंच बिनविरोध झाले आहेत व २१ ग्रामपंचायत थेट सरपंच पदासाठी ७५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर एकूण सदस्य पदाच्या ४८१ मधून ५० जणांनी अर्ज मागे घेतले. बहुतांशी ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले आहेत.

पाल ग्रामपंचायत बिनविरोध

पाल ग्रा.पं. सरपंच उमेदवारांमधून सुचिता सुरेश नाईक व मंगल नारायण गावडे यांनी अर्ज मागे घेतल्याने कावेरी कमलेश गावडे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर ११ प्राप्त अर्जापैकी ४ जणांनी अर्ज मागे घेतल्याने ७ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये शामल शामा केरकर, विनिता वामन गावडे, श्रीकांत सूर्यकांत गावडे, प्रिती प्रशांत गावडे, कृष्णा प्रशांत गावडे, स्नेहल नंदू पालकर व प्रदिप चंद्रकांत मुळीक हे बिनविरोध निवडून आले आहेत.

वेतोरे ग्रा. पं. सरपंचपद बिनविरोध

वेतोरे ग्रामपंचायत सरपंचपदासाठी २ अर्ज दाखल झाले होते. यामध्ये प्रणाली प्रशांत नाईक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने प्राची प्रदिप नाईक या बिनविरोध निवडून आल्या आहेत. थेट सरपंच पदासाठी आडेली १, अणसुर २, होडावडा १, कोचरा २, मठ १, मेढा १, पाल २, पालकरवाडी ५, परबवाडा १, परुळेबाजार १, शिरोडा ४, तुळस १, उभादांडा १, वजराट २ व वेतोरे १ इत्यादी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. तर रेडी, आसोली, चिपी, भोगवे, दाभोली, केळुस, कुशेवाडा, म्हापण या ग्रामपंचायतींमधून थेट सरपंच दाखल अर्जापैकी एकही अर्ज मागे घेण्यात आलेला नाही.

तसेच सदस्य पदासाठी दाखल ४८१ अर्जामधून ५० जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये रेडी १, आसोली ३, भोगवे ३, दाभोली ३, होडावडा ८, कोचरा १, कुशेवाडा ३, मठ २, म्हापण ६, पाल ४, पालकरवाडी ३, परबवाडा ५, परुळेबाजार २, शिरोडा ३, तुळस १, उभादांडा २  इत्यादींचा समावेश आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button