संगमनेरात सरपंच 93; सदस्यासाठी 666 उमेदवार ; 37 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक

संगमनेरात सरपंच 93; सदस्यासाठी 666 उमेदवार ; 37 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 133 प्रभांगासाठी सरपंचपदासाठी 93 तर सदस्य पदासाठी 666 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता खर्‍या अर्थाने ग्रामपंचायत निवडणुकीला रंगत चढणार आहे. संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. अर्ज माघारीसाठी गाव पातळीवरील नेत्यांनी अर्ज भरलेल्या उमेदवारांची मनधरणी करत त्यांना अर्ज माघारी घेण्यासाठी विनवणी केली. त्यानंतर शेवटचा फायनल निर्णय काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, साखर कारखान्याचे संचालक व यशोधन कार्यालयाचे प्रमुख इंद्रजीत थोरात यांनी घेतला.

तहसील कार्यालयाच्या आवारात उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी ग्रामपंचायतच्या उमेदवारांचे व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ज्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा आहे. त्यांनाच पोलिस तहसील कार्यालयाच्या आवारात सोडत होते.
उमेदवारांच्या इतर कार्यकर्त्यांना व समर्थकांना सोडत नव्हते.

त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या. तहसील कार्यालयाच्या आवारात उमेदवारी अर्ज मागे घेताना कुठल्या प्रकारची गडबड गोंधळ करू नये, म्हणून शहर पोलिस ठाण्यातील पोलिस सर्व बारीक-सारीक गोष्टींवरती लक्ष ठेवून होते. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची वेळ होती. त्यानंतर उशिराने आलेल्या अर्जाचा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी कुठल्या ही प्रकारचा विचार केला नाही. त्यानंतर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले.
संगमनेर तालुक्यातील खालील प्रमाणे ग्रामपंचायतच्या सरपंच आणि सदस्यपदासाठी खालील प्रमाणे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे.

ग्राम.पं.नाव सरपंच सदस्य

साकुर 2 34
खराडी 3 4
वाघापूर 3 2
चिंचोली गुरव 4 30
जांभुळवाडी 3 19
रणखांबवाडी 3 19
दरेवाडी 2 12
जांबुत बु 3 18
कर्जुले पठार 4 12
डोळासणे 0 10
पिंपरने 3 19
कोल्हेवाडी 3 34
कोळवाडे 2 0
मालुंजे 2 19
अंभोरे 2 24
निंबाळे 4 0
जोर्वे 3 28
वडझरी बु॥ 2 15
वडझरी खुर्द 2 8
ग्राम.पं.नाव सरपंच सदस्य
निमोण 2 24
तळेगाव दिघे 3 32
हंगेवाडी 2 14
कणकापूर 2 14
करूले 4 5
निळवंडे 2 7
पोखरी हवेली 2 23
सादतपुर 3 14
रहीमपूर 2 13
उंबरी बाळापूर 29 3
निमगाव जाळी 2 26
ओझर खुर्द 2 18
धांदरफळ खुर्द 2 21
धांदरफळ बु॥ 2 27
निमगाव भोजपुर 2 18
चिकणी 3 27
सायखिंडी 0 10
घुलेवाडी 5 45

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news