लहान मुले अंथरुणात लघवी करतात? हे आहेत उपाय… | पुढारी

लहान मुले अंथरुणात लघवी करतात? हे आहेत उपाय...

पुढारी ऑनलाईन डेस्क: लहान मुले रोज अंथरुणात लघवी करतात, मग आई वडिलांची चिडचिड सुरू होते. कुणा पाहुण्याच्या घरी गेले आणि मुलाने अंथरुण ओले केले की त्यांना शरमल्यासारखे वाटते. अनेकदा घरात, नातेवाईकांत त्यांची चर्चाही होते. पण मुळात हा विषय खूप संवेदनशीलपणे हाताळण्याचा आहे.

मुले अंथरुण ओले करू लागली की आई वडील एकमेकांवर आरोप करतात.

मात्र, हा पालकत्वाच्या चुकीचा विषय नसून मुलांवरील उपचाराचा विषय आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.

मुले अंथरुण ओले करतात म्हणून त्याला मारू नये अथवा रागावू नये.

मुले अंथरुणात लघवी करू नयेत यासाठी काही गोष्टी पाळणे गरजेचे आहे. त्याच्य आहारात बदल करणे गरजेचे आहे.

काय आहेत कारणं

  1. मुलांचे लहान मूत्राशय कदाचित पूर्णपणे विकसित झालेले नसू शकते.
  2. जर मूत्राशयावर नियंत्रण ठेवणाऱ्या नसा हळूहळू विकसित होत असतील तर मूत्राशय भरले हे समजून मुल जागे होत नाही.
  3. मोठ्या व्यक्तींमध्ये अँटिडाययुरेटिक हार्मोन (एडीएच) चे प्रमाण कमी असल्याने रात्री लघवी हळू तयार होते.
  4. मुलांना संसर्ग झाल्यामुळे लघवीवर नियंत्रण राहू शकत नाही.
  5. जर मुलं आधी अंथरूण ओले करत नव्हते आणि अलिकडे सारखेच ओले करतात तर ते मधुमेहाचेही लक्षण असू शकते.
  6. मुल तणशवात असेल तर भीतीयुक्त झोपेमुळे सुद्धा अंथरूण ओले होते.

काय करावे

  1. मुले जर रात्री नऊ किंवा त्या दरम्यान झोपी जात असतील तर सहानंतर कॉफी, चहा देऊ नये.
  2. तसेच त्यांना सायंकाळनंतर पाणी कमी द्यावे. रात्री झोपताना पाणी प्यायला देऊ नका.
  3. दिवसभर जेवढे गरजेचे आहे. त्यापैकी ८० टक्के पाणी दुपारी चारवार्जपर्यंत आणि सायंकाळी कमी प्रमाणात पाणी द्यावे.
  4. मुलांना लघवी रोखून धरण्याची सवय लावा.
  5. दिवसा मुलाने जर लघवी आली असे सांगितले तर त्याला काही वेळ म्हणजेच चार ते पाच मिनिटांपर्यंत लघवी रोखून धरायला लावा.
  6. त्याला तशी कल्पना द्या. त्याच्यावर सक्ती करू नका.
  7. मुले झोपी जाण्याआधी त्याला लघवीला जायला सांगतो.  मात्र, मुल झोपत असताना किंवा गुंगीत असताना त्याला पुन्हा लघवी करायला लावावी.
  8. लगेच किंवा कमी कालावधीत लघवी होणार नाही असे आपल्याला वाटू शकते, पण तसे नाही.  मुले लघवी करू शकतात.
  9. मुत्राशयामध्ये साठलेली लघवी बाळ बाहेर टाकते. त्यामुळे झोपेत बाळ लघवी करू शकत नाही.
  10. कळत्या वयातील मुलांशी आपण या विषयावर हसत खेळत बोलायला हवे. त्याला झोपताना असे ठरवायला सांगा की आज मी अंथरुण कोरडे ठेवणार. त्याला अंथरुण ओले करू नको असे सांगितले की तो ओलेपणाचा विचार करत झोपी जाऊ शकतो आणि लघवी करू शकतो.
  11. आई वडिलांपेक्षा मुले लवकर झोपी जातात. त्यामुळे आपण झोपी जाताना मुलांना झोपेतून उठवून किंवा उभे करून लघवी करायला लावावी.
  12. मुलांनी ज्या दिवशी झोपेत अंथरुण ओले केले नाही त्या दिवशी त्यांना काहीतरी बक्षीस द्या. शिवाय महिनाभराच्या कॅलेंडरवर तसा मार्क करा. महिन्यातील ठराविक दिवस जर अंथरुण ओले केले नाही तर तुला अमूक देईन किंवा तुला फिरायला नेईन असे सांगा. मात्र, मुलांना फास्ट फूड, गेम्स वैगेरे देऊ नका.
  13. पाहुण्यांकडे गेल्यावर किंवा घरात पाहुणे आल्यावर अंथरुण ओले केले म्हणून अजिबात रागावू नका. त्याची चर्चाही करू नका. बेडशीट बदलताना त्याला सोबत घ्या.

Back to top button