रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कोट्यवधी रूपयांची गुंतवणूक असलेला आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सव्वा लाख बेरोजगारांना रोजगार देणारा, अनेक पुरक आणि लघू उद्योगांना चालना देणारा नाणार रिफायनरी प्रकल्प होणारच अशी घोषणा केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राजापूर येथे केली.
प्रकल्प होऊ नये म्हणून काही लोक प्रयत्न करतायत पण तुंम्ही काळजी करू नका रिफायनरी होणारच असे आश्वासन यावेळी ना. राणे यांनी दिले.
आपल्याकडे असलेल्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अनेक योजना आहेत, ज्याचा लाभ घेऊन तुंम्ही उद्योजक होऊ शकता. तेव्हा माझ्या कोकणातील तरूण-तरूणीनो आता थांबून नका, रोजगार मागत फिरण्यापेक्षा इतरानांना रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक व्हा मी आणि केंद्र सरकार तुमच्या पाठीशी आहे अशी साद ना. राणे यांनी कोकणातील तरूण यावेळी तरूणांना घातली.
या यात्रेसोबत आमदार कालीदास कोळंबकर, आमदार अॅड. आशीष शेलार, माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, आ. नितेश राणे, भाजपाचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, जनआशीर्वाद रात्रेचे कोकण प्रमुख व माजी आमदार प्रमोद जठार आदी उपस्थित होते.
हे ही वाचलं का?