रत्नागिरी : लैंगिक अत्याचार प्रकरणी 20 वर्षे कारावास; घरी ये-जा करत त्याने ठेवले होते संबंध | पुढारी

रत्नागिरी : लैंगिक अत्याचार प्रकरणी 20 वर्षे कारावास; घरी ये-जा करत त्याने ठेवले होते संबंध

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने शिक्षा सुनावली. तालुक्यातील चांदेराई येथे ही घटना सप्टेंबर 2020 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत घडली होती. न्यायालयाने गुरुवारी (दि.१६ रोजी) 20 वर्ष कारावास आणि 37 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

संदेश सुरेश गुरव (27,रा.चांदेराई, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पिडीतेने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानूसार, संदेश गुरवचे पिडीतेच्या घरी येणे-जाणे होते. संदेशचे यापूर्वी लग्न झालेले असूनही त्याने पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवले. यानंतर तिच्यावर वेळोवेळी सप्टेंबर ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत अत्याचार केला.

त्यानंतर त्याने पिडीतेला मी तुझ्याशी लग्न करणार नाही असे सांगत तिला व तिच्या घरच्यांना ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत पिडीतेने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर ग्रामीणच्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया बंगडे यांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास करुन आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

20 वर्ष कारावासाची संदेश गुरवला सुनावली शिक्षा

गुरुवारी या खटल्याचा निकाल देताना अतिरिक्त विशेष न्यायाधिश वैजयंती ए.माला यांनी आरोपी संदेश गुरवला 20 वर्ष कारावास आणि 37 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. मेघना नलावडे यांनी काम पाहिले असून 11 साक्षीदार तपासले. तसेच पैरवी अधिकारी म्हणून संजीवनी मोरे, सुनिल आयरे यांनी काम पाहिले आहे.

हेही वाचा

Back to top button