मुंबई-गोवा महामार्गावर खवटी नजीक क्वालिसची टेम्पोला धडक: १ ठार, ५ जखमी | पुढारी

मुंबई-गोवा महामार्गावर खवटी नजीक क्वालिसची टेम्पोला धडक: १ ठार, ५ जखमी

खेड; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील खवटी रेल्वे पुला जवळ मंगळवार (दि.१७) रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास क्वालिस मोटार चालकाचे नियंत्रण सुटून मोटार रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून धडकली. या अपघातात एक जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत.

नगर : राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी किशोर वसंत चव्हाण (वय ४८ वर्षे, रा. धामापूर, ता. संगमेश्वर) हे क्वालिस मोटर (एमएच०४ बिएन४१९३) घेऊन धामापूर-संगमेश्वर ते मुंबई जात होते. मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील खवटी येथे पहाटे ३ वाजता किशोर यांचा मोटारीवरील ताबा सुटून मोटार रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या आयशर टेम्पो (एमएच०८ एपी६९९६) ला मागून धडकली. यामध्ये क्वालीस चालक किशोर यांला गंभीर जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचारासाठी नेण्यात आले असताना डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

मोटारीतून प्रवास करणारे सनम संदीप चव्हाण (वय १२ वर्षे), हर्षदा किशोर चव्हाण (वय ४० वर्षे), संतोष आबाजी चव्हाण (वय ५५ वर्ष), रितिका केशव चव्हाण (वय १६ वर्ष), सार्थक किशोर चव्हाण (वय १४ वर्ष),स्मिता संतोष चव्हाण (वय ५० वर्षे), स्नेहा सुरज कर्वे (वय २८ वर्षे) जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कशेडी पोलीस मदत केंद्रातील समेल सुर्वे व अन्य सहकारी यांनी घटनास्थळी पोहचून मदत केली.

हे वाचलंत का?

Back to top button