दापोली येथे पुण्यातील पर्यटकांवर कोयत्याने हल्ला | पुढारी

दापोली येथे पुण्यातील पर्यटकांवर कोयत्याने हल्ला

दापोली; पुढारी वृत्तसेवा : दापोली येथे पर्यटनासाठी आलेल्या पुणे पिंपरी चिंचवड, डांगे चौक येथील पर्यटकांवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना रविवारी (दि १५) सायंकाळी ६:३० च्या दरम्यान घडली. तर या पर्यटकांच्या गाडीची तोडफोड देखील झाली आहे. गाडी पार्किंग वरून सदर घटना घडली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

इनोव्हा (एमएच १४, जेएक्स ९६०३) या गाडीतून शुभम परदेशी (वय २९), सुरज काळे (वय २५), बळवंत कांबळे (वय २९), सुमीत गुजर (वय २६), नितीन अडसूळ (वय २५) हे पर्यटनासाठी दापोली येथे आले होते. यांना हर्णे येथील हॉटेल समुद्र संकेत या ठिकाणी कोयत्याने मारहाण केली असल्याचे समजते. मारहाण करणारे सातारा येथील असावेत असा कयास आहे.

या बाबत दापोली पोलीस स्थानक येथे उशिरा पर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. यातील शुभम परदेशी याच्या हाताला दुखापत झाली आहे. दापोली उप जिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.

Back to top button