चिपळूण, पुढारी वृत्तसेवा : शहरातील पाग गोपाळकृष्ण वाडी येथे आज (शुक्रवार) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका घराला अचानक आग लागली. या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत मालमत्तेचे नुकसान झाले असले, तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. येथील अरुण भालेकर यांच्या मालकीचे हे घर आहे. याठिकाणी भोजने कुटुंब भाड्याने राहत होते. शॉर्टसर्किटमुळे आग लागून गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग भडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे . नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने आग विझवली.
हेही वाचलंत का ?