भुईबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात भुस्खलन | पुढारी

भुईबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात भुस्खलन

वैभववाडीः पुढारी वृत्तसेवा : कोकणात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. भुईबावडा येथे झालेल्या जोरदार पावसाने भुईबावडा पहिलीवाडी येथील शेवरीचा कापाट येथील डोंगराचा अर्धा भाग खचून मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे.

अनेक झाडे उन्मळून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. वस्तीपासून डोंगर लांब असल्यामुळे सुदैवाने जिवितहानी टळली आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

आठवडाभरापासून राज्यासह कोकणात अतिमुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण उडविली आहे.

या अतिवृष्टीचा फटका भुईबावडा परिसराला बसला. पहिलीवाडी येथील शेवरीचा कापाट येथील डोंगराचा अर्धा भाग खचला आहे.

मोठ्या प्रमाणात कोसळल्याने अनेक झाडे उन्मळून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

हा खचलेल्या डोंगरातील दगड माती सध्या पडीक असलेल्या शेतजमिनीत आली आहे.

तर वाडीनजीक असलेली मोरी गाळाने भरली होती. सरपंच बाजीराव मोरे व ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने गाळ उपसून मोरी मोकळी केली आहे. हा डोंगर भाग बाळाजी बाळकृष्ण मोरे अन्य यांच्या मालकीचा आहे.

सुमारे दोन एकर परिसराचा डोंगर खचला आहे.

घटनेची माहिती मिळताच सरपंच बाजीराव मोरे, आकोबा मोरे, अमित फकीर, यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

Back to top button