रत्नागिरी : खेडमध्ये महसूल विभागाचा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात | पुढारी

रत्नागिरी : खेडमध्ये महसूल विभागाचा अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

खेड, पुढारी वृत्तसेवा

सातबारावर नावाची नोंद करण्यासाठी १४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना बुधवारी (दि. १२) रोजी भरणे मंडळातील एका अधिकाऱ्याला भरणे ग्रामपंचायत कार्यालयात रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

सचिन यशवंत गोवळकर (वय – ४३, वर्षे, मंडळ अधिकारी, भरणे , ता. खेड ,जि रत्नागिरी) असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत माहितीनुसार, खरेदी केलेल्या जमिनीच्या ७/१२ वर नावाची नोंद घालून ती मंजुर करून देण्यासाठी सचिन गोवळकर याने एका इसमाकडे १५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याबाबत समबंधित इसमाने रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

या तक्रारीनुसार, ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण, पोलिस हवालदार नलावडे, पोलिस नाईक हुंबरे यांच्या पथकाने १४ हजार रुपयांची लाच स्विकारताना भरणे येथील मंडळ अधिकारी कार्यालय त्याला रंगेहाथ पकडले.

हेही वाचलंत का? 

Back to top button