अधिवेशनात शक्ती विधेयकासह महत्त्वाची विधेयके मंजूर : अजित पवार

अधिवेशनात शक्ती विधेयकासह महत्त्वाची विधेयके मंजूर : अजित पवार

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शक्ति विधेयकासह अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यात आली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रयत्न त्या- त्या विभागाच्या मंत्र्यांनी केला. विरोधकांनाही विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्याची संधी देण्यात आली, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवार) पत्रकारांशी बोलताना दिली.

या अधिवेशनात विरोधकांनी विविध मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली. लक्षवेधी मांडण्यात आल्या, यावर आम्ही समाधानकारक उत्तरे दिली. विरोधकांनीही कामकाजात सहभाग घेत चांगले सहकार्य केले. विरोधकांना प्रश्न मांडण्याची संधी देण्यात आली. चर्चेला वेळ देण्यात आला. त्यामुळे सामजंस्याने अधिवेशन पार पडले.

शक्ती विधेयक मंजूर करण्यात आले. अनेक विधेयकांवर सामंजस्यपणे चर्चा करण्यात आली. नियोजन विभाग, गृह विभाग, अंतिम आठवडा प्रस्ताव, राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांना बोलण्याची संधी देण्यात आली. नियोजन विभागाच्या प्रश्नांवर मी उत्तरे दिली. तर गृह विभागाच्या लक्षवेधीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी उत्तरे दिली. विरोधकांच्या सुचनांवर समर्पक उत्तरे देण्यात आली. विरोधकांनीही विविध मुद्दे, प्रश्न उपस्थित करून सरकारच्या निदर्शनास आणून दिले, असेही अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news