Baramati By-Election: सर्वात मोठी बातमी! काँग्रेसची बारामतीमधून अखेर माघार? विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

Baramati Bypoll Congress withdrawal: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्या विनंतीनंतर आणि अंतर्गत चर्चेनंतर हा निर्णय झाला.
sunetra pawar
sunetra pawarPudhari
Published on
Updated on

Baramati Bypoll Congress withdrawal: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित वळण पाहायला मिळत आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत संपायला अवघे काही तास उरले असतानाच काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बारामतीत राजकीय समीकरणे अचानक बदलली असून या निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

या घडामोडींच्या केंद्रस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत. त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. बारामती हा पवार कुटुंबाचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो आणि त्यामुळे ही निवडणूक संघर्षाऐवजी सहमतीने पार पडावी, अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे सांगितले जाते.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्येही अंतर्गत चर्चा सुरू होती. अखेर पक्षाचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट संकेत दिले की, पक्ष या निवडणुकीतून माघार घेण्याच्या भूमिकेत आहे. “स्थानिक कार्यकर्त्यांची भावना, तसेच वरिष्ठ पातळीवरील चर्चा लक्षात घेता आम्ही हा निर्णय घेत आहोत. अंतिम निर्णय हायकमांडच्या निदर्शनास आणून दिला जाईल,” असे त्यांनी सांगितले.

sunetra pawar
Dell Layoffs: टेक कंपन्या संकटात! Dell कंपनीत मोठी कर्मचारी कपात; 11,000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ, कारण काय?

दरम्यान, या निर्णयामागे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे प्रयत्नही महत्त्वाचे ठरले. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी काँग्रेसला थेट विनंती करत निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी संपर्क साधून सहमतीची भूमिका मांडली होती.

या सर्व राजकीय हालचालींनंतर काँग्रेसने अखेर माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बारामतीतील लढत जवळपास एकतर्फी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग आता अधिक सुकर झाल्याचे मानले जात आहे.

sunetra pawar
Pimpri Chinchwad Bill Scam: पिंपरी-चिंचवडमध्ये 52 कोटींच्या बिलांचा घोटाळा?; कारवाईची मागणी

ही घडामोड केवळ एका पोटनिवडणुकीपुरती मर्यादित नाही, तर महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांचे संकेत देणारी आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांमधील समन्वय, तडजोडी आणि रणनीती कशा बदलत आहेत, याचे हे एक महत्त्वाचे उदाहरण मानले जात आहे. आता सर्वांचे लक्ष काँग्रेसच्या अधिकृत घोषणेकडे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news