Dell Layoffs: टेक कंपन्या संकटात! Dell कंपनीत मोठी कर्मचारी कपात; 11,000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ, कारण काय?

Dell Layoffs: AI चा वाढता वापर आणि खर्च कपात यामुळे Dell ने सुमारे 11,000 कर्मचाऱ्यांना कमी केले. सध्या Dell मध्ये सुमारे 97,000 कर्मचारी आहेत.
Dell Layoffs
Dell LayoffsPudhari
Published on
Updated on

Dell Layoffs: जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर झपाट्याने वाढत असताना, त्याचा थेट परिणाम रोजगारावर दिसू लागला आहे. मोठ्या टेक कंपन्या आता AI कडे वळत आहेत आणि त्याच वेळी खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर Dell Technologies ने गेल्या वर्षभरात मोठी कर्मचारी कपात केली आहे.

कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, Dell ने सुमारे 10 टक्के कर्मचारी कपात केली आहे. 31 जानेवारी 2026 पर्यंत कंपनीत जवळपास 97,000 कर्मचारी आहेत, जे एक वर्षापूर्वीच्या 1,08,000 च्या तुलनेत सुमारे 11,000 ने कमी आहेत. ही कपात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या मोठ्या पुनर्रचनेचा भाग आहे.

2025 आर्थिक वर्षातही Dell ने अशाच प्रकारे कर्मचारी संख्या कमी केली होती. त्यामुळे ही प्रक्रिया एकदा झालेली नसून, दीर्घकालीन योजनेचा भाग असल्याचे स्पष्ट होते. कंपनी सध्या सावध भरती धोरण (cautious hiring) अवलंबत आहे आणि खर्च नियंत्रणावर भर देत आहे.

Dell Layoffs
LPG Booking Update: LPG बुकिंगमध्ये मोठा बदल; सरकारचा ग्राहकांना इशारा, फक्त ओळखपत्रावर मिळणार...

यासोबतच, कर्मचारी कपातीसाठी दिल्या जाणाऱ्या सेवरन्स (severance) (कंपनीकडून काढून टाकल्यावर मिळणारी नुकसान भरपाई) खर्चातही घट झाली आहे. 2026 आर्थिक वर्षात Dell ने सुमारे 569 दशलक्ष डॉलर खर्च केले, जे मागील वर्षातील 693 दशलक्ष डॉलरपेक्षा कमी आहेत. यावरून कर्मचारी कपातीचा वेग आता काहीसा कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

Dell Layoffs
Gold Silver Price: लग्नसराईत ग्राहकांना दिलासा; सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, काय आहे आजचा भाव?

एकूणच, AI मुळे काम करण्याच्या पद्धतीत मोठा बदल होत आहे. कंपन्या अधिक कार्यक्षमतेसाठी Automation आणि AI चा वापर वाढवत आहेत, पण त्याच वेळी पारंपरिक नोकऱ्यांवर त्याचा परिणाम होत आहे. Dell चा हा निर्णय टेक इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या मोठ्या बदलांचा भाग मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news