बीड : गेवराईतील पांढरवाडी इथल्या शेतात अनोळखी मृतदेह; खुनाचा संशय | पुढारी

बीड : गेवराईतील पांढरवाडी इथल्या शेतात अनोळखी मृतदेह; खुनाचा संशय

गेवराई (बीड), पुढारी वृत्तसेवा

शहरालगत असणाऱ्या पांढरवाडी येथील गायरान शेतात अंदाजे 50 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. यावेळी गायरानधारकांनी त्याची माहिती गेवराई पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

मृतदेहाच्या डोक्यावर आणि चेह-यावर जखमा आढळून आल्याने प्रथमदर्शनी हा खुनाचा अंदाज वर्तवण्यात येत असून, मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. हा मृतदेह उपजिल्हा रूग्णलयात नेण्यात आला आहे.

हेही वाचा

Back to top button