औरंगाबाद : २०२४ च्या लोकसभेत ४५ खासदार तर २०० वर आमदार निवडून येतील : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

औरंगाबाद : २०२४ च्या लोकसभेत ४५ खासदार तर २०० वर आमदार निवडून येतील : चंद्रशेखर बावनकुळे

औरंगाबाद; पुढारी वृत्‍तसेवा : एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप युतीचे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 45 वर खासदार आणि विधानसभेत 200 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात राज्य सरकारचे अस्तित्व नव्हते. आता शिंदे व फडणवीस सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने काम करत आहे, असे ते म्‍हणाले.

मविआने वैधानिक विकास मंडळे बरखास्त केली. त्यांना मुदतवाढ दिली नाही. उलट 12 आमदारांच्या नियुक्त्यांशी त्यांचा संबंध जोडला. 12 आमदार नियुक्त करा मग विकास मंडळे पुनरुज्जीवित करतो अशी मागास भागांविरोधी भूमिका घेतली अशी टीका बावनकुळे यांनी केली.

राज्यात विधानसभा निवडणुका घ्या असे उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना दिलेले आव्हान हे सूर्याला दिवा दाखविण्यासारखे असल्याचा टोला त्यांनी लगावला. शिक्षक मुख्यालयी राहण्याच्या आमदार प्रशांत बम्ब यांच्या भूमिकेला पक्षाचा पाठिंबा आहे काय असे विचारले असता, केवळ शिक्षकच नव्हे तर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहायला पाहिजे. मात्र बंब यांनी शिक्षक, पदवीधर मतदारसंघ रद्द करण्याची केलेली मागणी वैयक्तिक असल्याचे बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा :  

Back to top button