औरंगाबाद : शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने रॉडने बेदम मारहाण | पुढारी

औरंगाबाद : शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने रॉडने बेदम मारहाण

औरंगाबाद : शिवीगाळ केल्याचा जाब विचारणार्‍या महिलेला चौघांनी रॉड व दांड्याने बेदम मारहाण केली. ही घटना 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संभाजी कॉलनी येथे घडली. पंकज वरदे, गुजा वरदे, रामू आणि एक महिला, अशी आरोपींची नावे आहेत.

पीडितेच्या फिर्यादीनुसार,तिला मारहाण करणारी महिला ही शिवीगाळ करत होती. त्यामुळे तिने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपी पंकज, गुजा आणि रामू यासह महिलेने तिची स्कुटी खाली पाडली. घरात शिरण्याचा प्रयत्न करून महिलेला रॉडने आणि दांड्याने मारहाण केली. टोकदार वस्तूने मारून जखमी केले. तसेच विनयभंगदेखील केला. याप्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Back to top button