वाघ पुरवठादार शहर, औरंगाबादची नवी ओळख | पुढारी

वाघ पुरवठादार शहर, औरंगाबादची नवी ओळख

सुनील कच्छवे; औरंगाबाद : औरंगाबाद वाघ पुरवठादार शहर बनले आहे. ऐतिहासिक शहर, मराठवाड्याच्या राजधानीचं शहर अशी या शहराची ओळख आहे. यासोबतच आता या शहराला एक नवी ओळख प्राप्त झाली आहे. ती म्हणजे वाघांचा पुरवठा करणारं शहर होय.

अधिक वाचा- 

कंडोम ऐवजी वापरला ‘हा’ पदार्थ; सेक्स केल्यानंतर जीवाला मुकला

पुणे आणि पिंपरी -चिंचवडसाठी दोनचाच प्रभाग? मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव येणार

मागील दहा वर्षात येथून महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह झारखंड, पंजाब, मध्य प्रदेश राज्यातील प्राणीसंग्रहालयांना १८ वाघ दिले गेले आहेत. आताही येथे १२ वाघ आहेत.

अधिक वाचा- 

सोलापूर : वाद पेटला! काँग्रेस शहराध्यक्ष वाले यांचा राजीनामा देण्याचा इशारा

ओझर येथे भरवस्तीत वृद्ध दाम्पत्याला घरात घुसून लुटले

वाघांची घटती संख्या हा तसा जगभरासाठी चिंतेचा विषय आहे. परंतु, हे शहर मात्र याला अपवाद ठरले आहे. महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयात चिंता आहे ती वाघांच्या वाढत्या संख्येची.

वाघांच्या प्रजननासाठी येथील वातावरण अनुकूल ठरले आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून येथे वाघांची संख्या सातत्याने वाढते आहे. पण, त्या तुलनेत इथे वाघांसाठी पुरेसे पिंजरे नाहीत. त्यामुळे केंद्रीय वन मंत्रालयाकडून अधूनमधून येथील वाघ इतर प्राणी संग्रहालयांना दिले जातात.

अधिक वाचा- 

तरुणांमध्ये हृदयविकार वाढल्याचे चित्र : डॉ. बिपीनचंद्र भामरे

ठाणे : शिवसेना विभाग प्रमुखावर जीवघेणा हल्ला

मागील २६ वर्षात या ठिकाणी ३५ वाघ जन्मले आहेत. एवढ्या वाघांना इथे ठेवणे शक्य नाही. त्यामुळे मागील दहा वर्षात येथून मुंबई, बोरीवली, पुणे, जमशेदपूर, मूकूंदपूर, झिराकपूर, इंदौर या ठिकाणी १८ वाघ दिले आहेत. सध्या येथी वाघांची संख्या १२ आहे.

 tiger
वाघ

३५ वर्षांपूर्वी प्राणी संग्रहालयाची सुरुवात 

महापालिकेने हिमायत बाग येथून १९७५ साली उद्यानाचे मध्यवर्ती बस स्थानकाजवळ स्थलांतर केले. या उद्यानाला सिद्धार्थ नाव देण्यात आले. आठ वर्षांनंतर १९८३ ते ८५ सालादरम्यान महापालिकेने सिद्धार्थ उद्यानात नव्याने प्राणी संग्रहालय उभारले.

तत्कालीन आयुक्त मनमोहन यांच्या प्रयत्नांतून हे प्राणी संग्रहालय सुरू झाले. त्याचे पहिले संचालक डॉ. रजवी होते. सध्या या प्राणी संग्रहालयात वाघ, बिबट्या यासह विविध प्रकारचे ३१० प्राणी आहेत.

हेदेखील वाचलंत का-

वारणा नदीत कोडोलीतील माय-लेकीची आत्महत्या

आजचे राशिभविष्य (दि. २५ ऑगस्ट २०२१)

संख्या वाढू नये म्हणून खबरदारी

येथे वाघांचा प्रजनन दर अधिक आहे. मात्र, येथील वाघांच्या पिंजऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे प्राणी संग्रहालय प्रशासनाची मोठी अडचण होते. वाघांची संख्या वाढली की अधूनमधून त्यातील एखादी जोडी इतर प्राणी संग्रहालयांना दिली जाते.

शिवाय संख्या वाढू नये यासाठी नर आणि मादी वाघ वेगवेगळे राहतील, याची दक्षता घेतली जाते.

मनपाच्या सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयात वाघांचं ब्रिडींग सर्वात अधिक होत आहे. याची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे आमच्याकडे जी ब्रीड आहे, जी प्रजाती आहे. त्याचा जेनेटिक मेकअप चांगल्या प्रतीचा आहे. त्यात रेसेसिव्ह जीन्स वगैरे आलेला नाही.
दुसरे म्हणजे इथे मिळणार वातावरण. त्यांची घेतली जाणारी काळजी हे देखील महत्त्वाचं आहे. आतापर्यंत आपण देशभरात १८ वाघ दिले आहेत. सध्याही महाराष्ट्रात सर्वात जास्त वाघ आपल्या प्राणी संग्रहालयात आहेत.
– डॉ. बी. एस. नाईकवाडे, संचालक, सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय.

Back to top button