बीड : नेकनूरच्या रुग्णालयात गर्भाशयाच्या गाठीची बिन टाक्याची शस्त्रक्रिया यशस्वी | पुढारी

बीड : नेकनूरच्या रुग्णालयात गर्भाशयाच्या गाठीची बिन टाक्याची शस्त्रक्रिया यशस्वी

नेकनूर; पुढारी वृत्तसेवा : स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिलाक शिंदे व स्त्रीरोगतज्ञ डॉ. अरुण घुगे यांच्या टीमने अतिशय गुंतागुंतीची महिलेच्या गर्भाशयाच्या गाठीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या गुरुवारी पार पाडली आहे. या शस्त्रक्रियामुळे शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांना दिलासा मिळाला. तीन तास ही शस्त्रक्रिया सुरु होती.

स्त्री रुग्णालय नेकनूर येथे महात्मा ज्योतीराव फुले योजनेअंतर्गत वैद्यकीय अधीक्षक स्त्रीरोगतज्ञ डॉ. आशिलाक शिंदे, स्त्रीरोगतज्ञ डॉ. अरुण घुगे व भुलतज्ञ डॉ. रेणुका संदीकर यांनी अतिशय गुतागुंतीची गर्भाशयाच्या पिशवीची बिन टाक्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. यामुळे या महिलेच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.

शस्त्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी रुग्णालयातील श्रीमती थोरात, सूर्यकांत काळे (ब्रदर ), सपना शिंदे (सिस्टर), कालिका (सिस्टर), ओ.टी सहाय्यक, श्री.परमेश्वर बांगर व पंडित मामा यांनी शस्त्रक्रियेसाठी जवळपास ३ तास मोठे परिश्रम घेऊन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. व वैद्यकीय समन्वयक डॉ. दुर्गेश जोशी, आरोग्यमित्र रंजित बांगर यांनी तांत्रिक कामकाज पाहिले.

हेही वाचलंत का? 

Back to top button