

पुढारी ऑनलाईन: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र पवार यांनी भारतातील सर्वोच्च विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. भारतातील विद्यापीठांच्या जाहीर करण्यात आलेल्या या यादीमध्ये बंगळूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे सर्वोच्च पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दुसऱ्या तर, जामिया मिलिया इस्लामिया हे तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांची यादी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये जाहीर करण्यात आली आहे. NIRF (National Institute Ranking Framework) रँकिंग यादीत एकूण ११ श्रेणींमध्ये भारतातील कॉलेजची विभागणी केली गेली आहे. यामध्ये मॅनेजमेंट, मेडिकल, डेंटल, रिसर्च इत्यादी श्रेणींसाठी टॉप लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारतातील IIT मद्रास, IISc बंगलोर, IIT Bombay, IIT दिल्ली, IIT कानपूर, IIT खरगपूर, IIT रुरकी, IIT गुवाहाटी, AIIMS नवी दिल्ली, आणि JNU नवी दिल्ली या टॉप 10 कॉलेजचा देखील समावेश आहे.