औरंगाबाद : सेवानिवृत्त तलाठ्याची आत्महत्या; मृतदेहाजवळ चाकू आढळल्याने खूनाचा संशय | पुढारी

औरंगाबाद : सेवानिवृत्त तलाठ्याची आत्महत्या; मृतदेहाजवळ चाकू आढळल्याने खूनाचा संशय

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : सिद्धार्थ उद्यानातील मत्स्यालयाजवळ झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सेवानिवृत्त तलाठ्याच्या मृतदेह आढळून आला. त्यांच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले असून मृतदेहाच्‍या बाजूलाच एक चाकू आढळल्याने खूनाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बशीर शहमद शेख (वय-५८, रा. शिंगीपिंप्री. ता.गंगापूर. जि.औरंगाबाद) असे मृत तलाठ्याचे नाव आहे. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी आकस्‍मिक मृत्यूची नोंद केली आहे.

याबबातची माहिती अशी की, बशीर शहमद शेख हे काही महिन्यांपूर्वी तलाठी पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांची बहीण औरंगाबादमध्ये वास्तव्यास आहे. बशीर हे बहिणीला भेटण्यासाठी शनिवारी (दि.२) रोजी रात्री औरंगाबादेत आले होते. यानंतर ते  बहिणीकडे थांबले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते घरी गंगापूर येथे जाण्यासाठी निघाले. मात्र ते घरी न जाता सिद्धार्थ उद्यानात गेले.

या दरम्यान झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह उद्यानात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना दिसला. उद्यानातील मत्स्यलयाजवळील झुडुपात त्यांचा मृतदेह आढळून आला. यावेळी त्याच्या शरीरावर धारदार शास्त्राने अनेक वार केल्याचे आढळून आले. यानंतर याबाबतची माहिती कर्मचऱ्यांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास क्रांतिचौक पोलीस करीत आहेत.

मृतदेहाजवळ पिशवी व चाकू

बशीर शेख यांचा मृतदेह आढळून आला त्या ठिकाणी पोलिसांना एक पिशवी आढळून आली आहे. त्या पिशवीमध्ये शेख यांचे कार्यालयीन कागदपत्रे आहेत. घटनास्थळी एक धारदार चाकू पोलिसांना आढळून आला आहे. प्रथमदर्शनी हा आत्महत्येचा प्रकार असू शकतो, अशी माहिती क्रांतिचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी दिली.

हेही वाचलंत का?

Back to top button