औरंगाबाद : महाविद्यालायाच्या आवारात चाकूने भोसकून तरुणीची हत्या | पुढारी

औरंगाबाद : महाविद्यालायाच्या आवारात चाकूने भोसकून तरुणीची हत्या

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : कॉलेज परिसरातून 200 फूट ओढून नेत 19 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. शनिवारी (दि. 21) भरदिवसा गजबजलेल्या देवगिरी कॉलेज परिसरात ही खळबळजनक घटना  घडली. या घटनेने औरंगाबाद शहर हादरून गेले आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असावा असा अंदाज व्यक्‍त केला जात आहे.

ग्रंथी सुखप्रीत कौर प्रीतपाल सिंग असे मृत (वय 19) विद्यार्थींनीचे नाव आहे. ती बीबीए प्रथम वर्गात शिकत होती. मारेकऱ्याने तिला 200 फूट ओढत नेऊन खून केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ उडाली. ज्यांनी हा प्रकार पाहिला त्यांची देखील पळापळ झाली. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वेदांतनगर ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही तपासून मारेकऱ्याचा शोध सुरू केला. तर गुन्हे शाखा पथकही आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा  

Back to top button