अमेरिकेतील सेमी कंडक्टर उद्योग अडचणीत | पुढारी

अमेरिकेतील सेमी कंडक्टर उद्योग अडचणीत

न्यूयॉर्क ; वृत्तसंस्था : विदेशातील कुशल मनुष्य बळाला रोखण्यासाठी अमेरिकन प्रशासनाने ग्रीन व्हिसावर अनेक निर्बंध लादले आहेत. त्याची झळ आता अमेरिकेला बसत आहे. त्यामुळे भारतीय टॅलेंटला संधी देण्याचे आणि ग्रीन कार्डचे निर्बंध शिथिल करण्याचे अमेरिका विचार करत आहे. अमेरिकेचे संरक्षण आणि सेमी कंडक्टर उद्योग आता अडचणीत सापडले आहेत.

विदेशी टॅलेंटला रोखण्याच्या नादात अमेरिकेचे तंत्रज्ञानावर असलेले वर्चस्व कमी होण्याचा धोका काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ग्रीन कॉर्डमध्ये विदेशींना सवलत देण्याचा अमेरिकन प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. त्यामुळे अमेरिकेचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबत चीनवर दबाव कायम राहण्यास मदत होणार आहे.

कुशल मनुष्य बळाअभावी संरक्षण आणि सेमी कंडक्टर अडचणीत सापडले आहेत. अमेरिकेतील अरिजोना राज्यात कुशल इंजिनिअरांची चणचण भासत आहे. त्यामुळे सेमी कंडक्टर उद्योगाला आपले टार्गेट पूर्ण करता आले नाही.

सेमी कंडक्टर उद्योग यामध्ये अमेरिकेने सुमारे 1 लाख कोटीची गुंतवणूक केली आहे; मात्र कुशल मनुष्यबळाअभावी अमेरिकेला आऊटसोर्सिंग करावे लागत आहे. कुशल मनुष्यबळाची कमतरता भारत पूर्ण करू शकतो. आतापर्यंत भारताने अमेरिकेला तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल मनुष्यबळ पुरवले आहे.

चीनचा मोठा धोका

1990 मध्ये सेमी कंडक्टरच्या उत्पादनातील हिस्सा जगाच्या तुलनेत 40 टक्के होता. आता केवळ 10 टक्केच सेमी कंडक्टरची देशात निर्मिती केली जाते. यामध्ये आता चीनने बाजी मारली आहे. त्यामुळे चीन जगभराची बाजारपेठ व्यापून टाकण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रामुख्याने भारतीय टॅलेंटला संधी देण्याचा अमेरिकन प्रशासन गांभीयाने विचार करत आहे.

Back to top button