तळेगाव ढमढेरे तेथील मुख्य बाजारपेठेतील दोन घराना आग | पुढारी

तळेगाव ढमढेरे तेथील मुख्य बाजारपेठेतील दोन घराना आग

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर ) येथे मुख्य बाजारपेठेतील अजय पोखर्णा आणि सचिन मेटे यांच्या मालकीच्या घराला अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

१ हजार नव्‍हे ३ हजार कोटींचा घोटाळा, आशिष शेलारांकडून भूखंड घोटाळ्याप्रकरणी पुन्‍हा आरोप

तळेगाव ढमढेरे मुख्य पेठेत घराला आग लागल्याची घटना गावभर पसरली. आगीचे कारण समजले नाही. जुन्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर आगीचे लोट दिसत होते. ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस प्रशासन, अग्निशमन प्रशासन घटनास्थळी योग्य वेळेत दाखल झाले. तब्बल दोन तास चाललेल्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळाले.

संभाजीराजेंनी घेतली फडणवीसांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

तळेगाव ढमढेरे येथे प्रथमच अग्निशमन दलाची गाडी पाचारण करण्यात आली. यावेळी पेठेमधून जाण्यासाठी या गाडीला रस्ताही मिळेना अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या रस्त्याच्या अडचणीमुळे वेळेवर पोहचता आले नाही. बघ्यांची मात्र यावेळी जास्तच गर्दी झाली होती.

हेही वाचा

महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट; संजय राऊतांचा सोमय्यांवर आरोप

Pandit Shivkumar Sharma : ज्‍येष्‍ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

The Kashmir Files : विवेक अग्निहोत्रीच्या द कश्मीर फाईल्सवर सिंगापूरमध्ये बंदी

Back to top button