अजिंठा : गोठ्याला आग लागल्याने चार जनावरे ठार, दोन होरपळून जखमी | पुढारी

अजिंठा : गोठ्याला आग लागल्याने चार जनावरे ठार, दोन होरपळून जखमी

अजिंठा : मुनीर पठाण

सिल्लोड तालुक्यात शिवणा येथे शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्याला आग लागून काही जनावरे दगावली, तर काही जनावरे भाजली गेली आहेत. त्याचबरोबर शेती साहित्य जळून खाक झाले आहे, यामुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

शिवणा येथे बुधवारी (ता. २०) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अचानक शेतातील गोठ्याला आग लागून गोठ्यात असलेल्या जनावरांपैकी एक गाय, एक बैल, एक म्हैस, एक रेडा या आगीत दगावला. गायी व बैल भाजल्याने जखमी झाले आहेत. घटनास्‍थळी गावकऱ्यांनी धाव घेऊन आग आटोक्‍यात आणली. तोपर्यंत शेतकऱ्याचे अंदाजे ३ लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.

औरंगाबाद : लाकडी दांडक्‍याने ठेचून तरूणाचा खून

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शिवणा येथील शेतकरी मोहमंद मोहीन मोहमंद शफी यांचे गावाजवळील शेत गट क्र . ४२१ मधील गोठ्यात सयंकाळी आठ ते दहा जनावरे बांधली होती. दिवसभर काम करून रात्रीच्या वेळी सलगडी जेवण करून अराम करत होते.

रात्री बाराच्या सुमारास अचानक गोठ्याला आग लागल्याची माहिती सलगड्यांनी शेजाऱ्यांना मोबाइलवरून दिली. त्‍यांनी काही गावकऱ्यांना शेताकडे बोलावून घेतले. दरम्यान, माहिती मिळाल्यानंतर लगेचच गावकऱ्यांनी घटनास्‍थळी धाव घेतली. त्यांच्याकडून ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला गेला मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला.

आत बांधलेल्या काही जनावरांनी दावे तोडून पळ काढला. मात्र, ज्यांची दावे तुटली नाहीत त्यापैकी काही जनावरे भाजली गेली. तसेच एक गाय, एक बैल, एक म्हैस, म्हैसीचं रेडकू असे एकूण चार जनवरे दगावली गेली. त्याचबरोबर गोठ्यात असलेले शेती साहित्य, जनावरांची वैरण जळाल्याने अंदाजे तीन लाखाच्यांवर नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण मात्र अद्याप कळू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच महसुल विभागाचे तलाठी यांनी घटनेची पहाणी करून पंचनामा केला. या दुर्दैवी घटनेमुळे संबंधित शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

हेही वाचा

Back to top button