धनंजय मुंडेंकडे १० कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्माला अटक | पुढारी

धनंजय मुंडेंकडे १० कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्माला अटक

मुंबई, पुढारी ऑनलाईन : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देत ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा हिला अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी  मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

धनजंय मुंडे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, “मी रेणू शर्मा या महिलेला ओळखताे. आपण तिला एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून ३ लाख रुपये दिले. तसेच एक मोबाईल फाेनही कुरिअरच्या माध्यमातून पाठवला हाेता”. रेणू शर्मा हिने मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही दिवसांतच तिने ही तक्रार मागे घेतली होती. तेव्हापासून रेणू शर्मा ही परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हाॅट्सएप तसेच फोन करून मुंडेंकडून पैशांची  मागणी करत होती. यासंदर्भातील सर्व पुरावे धनंजय मुंडे यांनी पोलिसांना दिले आहेत.

‘अगर मंत्री पद बचाना चाहते हो, तो दस करोड कौनसी बडी बात है?’

”पिछले साल एक कागज सोशल मीडिया पर डाला तो तुम्हारा मंत्रीपद जानेकीं नौबत आ गई थी। अब अगर मेरी मांग पूरी नहीं की तो बदनाम कर दुँगी। अगर मंत्री पद बचाना चाहते हो, तो दस करोड कौनसी बडी बात है?”,असा मॅसेज तिने मुंडेंना पाठविला होता. त्याचबरोबर ५ कोटी रुपये कॅश आणि ५ कोटी रुपयांचे दुकान विकत घेऊन देण्याची मागणी रेणू शर्माने केली असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

पाोलिसांनी अशी केली कारवाई

रेणू शर्मा ही मूळ इंदौर येथील असून करुणा शर्मा यांची बहीण आहे, मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्रँच आणि इंदौर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक करून आधी (ता.२०) इंदौर कोर्टात हजर केले होते.  आज (ता.२१) तिला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पाॅडकास्‍ट  : भोंग्यांचे राजकारण I पुढारी | अग्रलेख

हे वाचलंत का? 

Back to top button